घरमहाराष्ट्रहैद्राबाद मुक्तीसंग्राम दिन; ध्वजारोहनाला इम्तियाज जलील अनुपस्थित

हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिन; ध्वजारोहनाला इम्तियाज जलील अनुपस्थित

Subscribe

हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा सोडून उपस्थिती लावली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. मात्र, इम्तियाज जलील खासदार असूनही कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत.

हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने औरंगाबाद येथे आयोजित कार्यक्रमाला खासदार इम्तियाज जलील उपस्थित नव्हते. सलग पाचव्या वर्षी जलील कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. याअगोदर आमदार असताना गेली चार वर्षे ते अनुपस्थित राहिले आहेत. आता औरंगाबाद शहराचे खासदार झाल्यानंतरही त्यांनी कार्यक्रमाला अनुपस्थिती लावली आहे. दरम्यान, हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा सोडून उपस्थिती लावली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. मात्र, जलील खासदार असूनही कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत. खासदार म्हणून त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, तरीही जलील उपस्थित न राहिल्यामुळे त्यांची अनुपस्थिती अनेकांना खटकली आहे.


हेही वाचा – कोकणात कमळाबाईक इचारता कोण…

- Advertisement -

 

‘मला देशभक्तीचे प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही’

दरम्यान, आपल्या अनुपस्थितीवर जलील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘माझ्या उपस्थिती किंवा अनुपस्थितीवरुन कुणी माझ्या देशभक्तीची तुलना करु नये. यासारखे विचार डोक्यात येते यावरुन संबंधितांची मानसिकता लक्षात येते. अशा मानसिकतेच्या लोकांकडून मला देशभक्तीचे प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही’, इम्तियाज जलील म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – साहेब टायमिंगच्या शोधात?


 

काय आहे हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचा इतिहास?

औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ उद्यानात हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील शहिदांना अभिवादन करुन ध्वजारोहन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. स्वातंत्र्य पूर्व काळात हैद्राबाद हे देशातील स्वायत्त संस्थान होते. या संस्थानात सध्याचे तेलंगणा, मराठवाडा, उत्तर कर्नाटक, विदर्भाचा काही भाग होता. या संस्थानवर निजामचे राज्य होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील सर्व संस्थानांना भारतात विलीन करण्यात आले. हैद्राबादच्या निजामाने या निर्णयाला विरोध केला. मात्र, हैद्राबादच्या जनतेला भारतात विलीन व्हायचे होते. त्यामुळे लोकांनी सत्याग्रह आणि आंदोलने केली. अखेर देशाचे तत्कालीन पंतप्रधानि पंडीत जवाहरलाल नेहरु आणि गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांनी लष्करी कारवाई केली आणि हैद्राबाद भारतात विलीन झाले. या लढाईत अनेक सर्वसामान्य नागरिक आणि लष्कराचे जवान शहीद झाले. १३ सप्टेंबर १९४८ रोजी भारताने हैद्राबादला भारतात विलीन करुन घेतले. त्यामुळे या मुक्तीसंग्रामत शहिद झालेल्यांच्या या दिवशी श्रद्धांजली वाहिली जाते. त्याचबरोबर दरवर्षी या दिवशी ध्वजारोहनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र, या कार्यक्रमाला गेल्या चार वर्षांपासून इम्तियाज जलील गैरहजर राहत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -