घरताज्या घडामोडीपंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यात अपयशी नेते, देशाची अधोगती झाल्याचा काँग्रेसचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यात अपयशी नेते, देशाची अधोगती झाल्याचा काँग्रेसचा आरोप

Subscribe

पंतप्रधान मोदी सगळ्यात अपयशी नेते आहेत. ते सपशेल नापास झाले असून त्यांनी देशाची आर्थिक अधोगती व जगात नाचक्की केली

केंद्रामधील मोदी सरकारला सत्तेत येऊन आज (रविवार ३० मे) ७ वर्षांचा कालावधी पुर्ण झाला आहे. देशात ७ वर्षांमध्ये आर्थिक अधोगती झाली असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. मोदी सरकारने ७ वर्षांची वाटचाल केली यावर राज्यात काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. तसेच मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या कामकाजाविरोधात निदर्शनं काढण्यात आली आहेत. मोदी सरकारने देशाची आर्थिक अधोगती व जगात नाचक्की केली आहे. तसेचन नरेंद्र मोदी सगळ्यात अपयशी नेते असून ते सपशेल नापास झाले असल्याची खोचक टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केले आहे.

केंद्र सरकारने गेल्या ७० वर्षात जे कमवलं होतं ते अवघ्या ७ वर्षांच्या कालावधीत गमवले असल्याचा आरो करण्यात आला आहे. गेल्या ७ वर्षात देशात द्वेष, महागाई व बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे पंतप्रधान मोदी सगळ्यात अपयशी नेते आहेत. ते सपशेल नापास झाले असून त्यांनी देशाची आर्थिक अधोगती व जगात नाचक्की केली असल्याचे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सचिन सावंत यांनी ट्विट करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी सगळ्यात अपयशी नेते आहेत. सपशेल नापास झाले. देशाची आर्थिक अधोगती व जगात नाचक्की झाली. संस्थांची विश्वासार्हता व लोकशाही रसातळास गेली. द्वेष,महागाई व बेरोजगारी भयानक वाढली. मोदीमित्र गब्बर व लोक गरीब झाले. ७० वर्षात मिळवले ते ७ वर्षांत गमावले असल्याचे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

भाई जगताप यांची भाजपवर टीका

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मोदींच्या ७ वर्षांच्या वाटचालीवर निदर्शनं करुन जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल केली आहे. मागील ७ वर्षात देशाचा विकास झालाच नाही तर देश भकास केला आहे. मागील ७ वर्षांत मोदींनी काय विकास केला असा सवाल भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधा नरेंद्र मोदी सर्वात अकार्यक्षम पंतप्रधान आहेत. मागील ७० वर्षात जे देशाने कमावलं होते ते अवघ्या ७ वर्षांत गमावल असल्याचा टोला आमदार भाई जगात यांनी लगावला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -