घरमहाराष्ट्रIndorikar Maharaj : इंदोरीकर महाराजांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले; लाकडं नेणाऱ्या ट्रॅक्टरला...

Indorikar Maharaj : इंदोरीकर महाराजांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले; लाकडं नेणाऱ्या ट्रॅक्टरला धडक

Subscribe

कीर्तनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या गाडीला जालना येथे अपघात झाला. या अपघातात इंदोरीकर महाराज थोडक्यत बचावले आहेत. त्यांच्या स्कॉर्पियो या गाडीने लाकडं नेणाऱ्या ट्रॅक्टरला धडक दिली. यात चालक किरकोळ जखमी झाला. या अपघातात इंदोरीकर महाराजांना कुठलीही इजा झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरीकर महाराज बुधवारी जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी या ठिकाणाहून कीर्तनासाठी जात होते. यावेळी परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरवर लाकडं घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला त्यांच्या गाडीने धडक दिली. ही घटना बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली. एमएच १२ टीवाय १७४४ या क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पियोने इंदोरीकर महाराज प्रवास करत होते. या अपघआतात इंदोरीकरांना कोणतीही इजा झालेली नाही. त्यांच्या गाडीचा चालक संजय गायकवाड हे किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परतुरचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी शाम पांढरपोटे, नरेंद्र चव्हाण, दीपक खरात घटनास्थळावर दाखल झाले. जखमी चालकाला पोलिसांच्या मदतीने शहरातील अस्थिरोग तज्ञ डॉ. सत्यानंद कराड यांच्या सिटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शामसुंदर शामसुंदर कौठाळे यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान, अपघातानंतर इंदोरीकर महाराजांना घटनास्थळावरुन दुसऱ्या वाहनाने खांडवीवाडी येथो पोहोचवण्यात आलं. या ठिकाणी त्यांचं होणारं किर्तन नियोजित वेळेत पार पडलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -