घरताज्या घडामोडीइंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम उधळून लावू

इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम उधळून लावू

Subscribe

कोल्हापुरातील इंदोरीकर महाराज यांच्या कार्यक्रमाला अंनिस, पुरोगामी संघटनांनी विरोध केला आहे. स्त्री जातीचा अपमान करणाऱ्यांचा कार्यक्रम नको अशी भूमिका या संघटनांनी घेतली आहे.

आज इंदोरीकर महाराज याचा कोल्हापुरातील शिवाजी विद्यापिठात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. मात्र इंदोरीकर महाराजांच्या या कार्यक्रमाला अंनिस, पुरोगामी संघटनांनी विरोध केला आहे. इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम आम्ही उधळून लावू, असा इशारा पुरोगामी महिला संघटनांनी इशारा दिला आहे. तसंच स्त्री जातीचा अपमान करणाऱ्यांचा शिवाजी विद्यापिठात कार्यक्रम नको अशी भूमिका या संघटनांनी घेतली आहे. या कार्यक्रम स्थळी या संघटनेतील कार्यकर्त्यांनी सकाळी जाऊ जाब विचारला. त्यावेळेस इंदोरीकर महाराज समर्थक आणि विरोध आमने-सामने आले शाब्दिक वाद झाला. यादरम्यान इंदोरीकर महाराज समर्थक असलेल्या कोल्हापूर युवासेनेनं या विरोधी संघटनेला प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, जर कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला तर जशाचं तसंच उत्तर देऊ, असा त्यांनी या विरोधी संघटनांना इशारा दिला आहे.

‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथील झाला तर मुलगी होते’ असं विधान त्यांनी नगर येथे झालेल्या कीर्तनात केलं होत. या वादग्रस्त विधानानंतर पहिल्यांदाच आज सायंकाळी सहा वाजता इंदोरीकर महाराजांच कीर्तन होणार आहे. त्याबद्दल सर्वांमध्ये औत्सुक्यही आहे. कीर्तन महोत्सवाचे संकल्पक, अध्यक्ष डॉ. प्रवीण कोडोलीकर यांनी विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात इंदोरीकर महाराजांचा कीर्तनाच्या कार्यक्रमाच आयोजन केलं आहे.

- Advertisement -

मात्र अंनिस, पुरोगामी महिला संघटनांना याला विरोध केला आहे. इंदोरीकर यांना कोल्हापुरात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा अंनिसचा सीमा पाटील यांनी दिला आहे. तसंच अंनिस, पुरोगामी संघटनेचे कार्यकर्ते कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांची भेट घेणार आहेत.


हेही वाचा – दिल्ली जळताना अमित शहा कुठे होते ? सामनाच्या अग्रलेखातून अमित शहांची झाडाझडती

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -