घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात येण्यासाठी उद्योग वेटिंग लिस्टवर, नारायण राणेंचा दावा

महाराष्ट्रात येण्यासाठी उद्योग वेटिंग लिस्टवर, नारायण राणेंचा दावा

Subscribe

मुंबई – राज्यातील प्रकल्प महाराष्ट्राभर जात असल्याने भाजपावर टीका होत आहे. मात्र, महाराष्ट्रात उद्योग प्रकल्प येण्याकरता वेटिंगलिस्टवर असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

कालपर्यंत जे सत्तेवर होते, ते राज्यामध्ये उद्योग आणू शकले नाहीत, ते आता टिका करत आहेत. प्रकल्प गेले तसे येतील. महाराष्ट्र आणि मुंबईत उद्योग वेटिंग लिस्टवर आहेत. उद्योग महाराष्ट्रात यावेत याकरता पोषक वातावरण या नव्या सरकारकडून निर्माण केलं जाईल, असा माझा विश्वास आहे, असं नारायण राणे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

नोटाबंदीमुळे रोजगार तयार करायला किंवा उद्योग यायला काहीही बंधने आलेली नाहीत असंही नारायण राणे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधकांकडून केली जातेय. त्यांच्या या मागणीला नारायण राणेंनी विरोध केला आहे. नारायण राणे म्हणाले की, ओला दुष्काळ जाहीर न करता मदत मिळतेय. ओला दुष्काळ जाहीर करायला काही निकष असतात. नैसर्गिक आपत्ती जाहीर करण्यासाठी काही निकष लावले जातात. त्या निकषानुसार ओला दुष्काळ जाहीर केला जातो.

- Advertisement -

काल अब्दुल सत्तारांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले. यावरून अब्दुल सत्तार रडारवर आले आहेत. त्यांच्याविषयी नारायण राणेंना विचारले असता नारायण राणे म्हणाले की, सत्तारांचा प्रश्न वेगळा आहे, मला बोलायचं नाही. मनोरंजनाचा विषय मी हाताळत नाही. मी उद्योग द्यायला चाललो आहे. देशाच्या प्रगतीविषयी मला विचारा, मी बोलू शकेन.

हेही वाचा – मावळा गोरापान, चिकना कधी होता? हर हर महादेव चित्रपटावरून जितेंद्र आव्हाडांचा सवाल

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -