हिमाचलमध्ये 26 नेत्यांचा भाजमध्ये प्रवेश; विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला झटका

मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी सुधन सिंह यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

निवडणूक जाहीर झाल्याने सर्वत्रच जोरदार टायरची सुरु झाली आहे. अशातच हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक (himachal pradesh assembly election 2022) होण्यापूर्वीच काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेश मधील काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस धर्मपाल ठाकूर खंड यांच्यासोबत राज्यातील अनेक काँग्रेसच (congress)नेते आणि सदस्य यांनी सोमवारी भाजपमध्ये (bjp) प्रवेश केला. यामुळे काँग्रेसच्या चिंतेत वाढ झाली आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये (himachal pradesh assembly election 2022)  12 नोव्हेंबर 2022 रोजी मतदान होणार असून 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान होण्यापूर्वीच 4 दिवस आधी काँग्रेसच्या एकूण 26 नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसला हिमाचल मध्ये मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी सुधन सिंह यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी सिमला येथील भाजपचे उमेदवार संजय सूदही उपस्थित होते.

काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये (bjp) प्रवेश केलेल्यांमध्ये काँग्रेसचे माजी सरचिटणीस धर्मपाल ठाकूर, माजी सचिव आकाश सैनी, माजी नगरसेवक राजन ठाकूर, माजी जिल्हा उपाध्यक्ष अमित मेहता, मेहेरसिंग कंवर, युवक काँग्रेसचे राहुल नेगी, जय माँ शक्ती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जोगिंदर ठाकूर, नरेश वर्मा, चमयाना प्रभाग सदस्य योगेंद्र सिंह, टॅक्सी युनियनचे सदस्य राकेश चौहान, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज सिमलाचे अध्यक्ष धर्मेंद्र कुमार, वीरेंद्र शर्मा, राहुल रावत, सोनू शर्मा, अरुण कुमार, शिवम कुमार आणि गोपाल ठाकूर यांचा समावेश आहे. काँग्रेस मधून बाहेर पडत यांनी भाजप सोबत हातमिळवणी केल्याने काँग्रेसच्या (congress) अडचणी वाढल्या आहेत.

यांच्यासोबतच चमन लाल, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव देवेंद्र सिंह, महेंद्र सिंह, माजी युवक काँग्रेसचे सरचिटणीस मुनीश मंडला, बाळकृष्ण बॉबी, सुनील शर्मा, सुरेंद्र ठाकूर, संदीप समता आणि रवी यांनीदेखील सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या सर्वांचे भाजपमध्ये जोरदार स्वागत केले. ‘भाजपच्या ऐतिहासिक विजयासाठी एकत्र काम करूया’ असंही ते म्हणाले.

त्यापूर्वी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हिमाचल विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाचा विजय निश्चित आहे असे म्हटले आहे. याचसंदर्भांत ते म्हणाले, राज्यातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्यावर विश्वास आहे. त्यांनी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचे कौतुक केले सोबतच त्यांनी जमिनीवर धोरणे राबविल्याचेही सांगितले.


हे ही वाचा –  साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल