घरमहाराष्ट्रआत संत तुकाराम महाराजांचे मंदिर केवळ 14 जूनला राहणार बंद - नितीन...

आत संत तुकाराम महाराजांचे मंदिर केवळ 14 जूनला राहणार बंद – नितीन महाराज मोरे

Subscribe

देहूतील संत तुकाराम महारजांचे मंदिर दर्शनासाठी भाविकांना बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानने मागे घेतला आहे. केवळ 14 जूनला कार्यक्रमादिवशी सायंकाळी पाचपर्यंत मंदिर भाविकांसाठी बंद राहणार असल्याचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे. शनिवारी देहूतील तुकोबांचे मंदिर भाविकांसाठी तीन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी सांगितले होते. मात्र, या निर्णयानंतर समाजमाध्यमांवर आलेल्या प्रतिक्रिया आणि भाविकांच्या गौरसोयीमुळे हा निर्णय बदलण्यात आल्याचे नितीन महाराज मोरे यांनी सांगीतले.

सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर बंद ठेवण्याच निर्णय –

- Advertisement -

14 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तुकोबांच्या मंदिर आणि मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने देहू संस्थान ने मंदिर तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तो निर्णय आत बदलण्यात आला असून याविषयी देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी माहिती दिली आहे.

यामुळे निर्णय घेतला मागे – 

- Advertisement -

राज्यभरातून तुकोबांच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येकी दोन तासांनी दर्शन थांबविण्यात येणार आहे. मात्र, त्या वेळेत आलेल्या भाविकांना स्क्रिनच्या माध्यमातून मुखदर्शन घेता येईल याची सोय केली आहे. दोन दिवस संस्थानला सहकार्य करून स्क्रिनवरून दर्शन घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली. यावेळी केंद्रीय यंत्रणा यांनी अस म्हटले नाही, की मंदिर बंद ठेवा. पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तीन दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता तो मागे घेण्यात आला आहे. कार्यक्रमा दिवशी म्हणजे १४ जून रोजी मंदिर बंद राहणार असल्यामुळे कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -