घरमहाराष्ट्रखासगी रुग्णालयांची जबाबदारी सनदी अधिकाऱ्यांवर की सहायक आयुक्तांवर?

खासगी रुग्णालयांची जबाबदारी सनदी अधिकाऱ्यांवर की सहायक आयुक्तांवर?

Subscribe

अनेक खासगी रुग्णालयांमध्ये लूट सुरुच, सनदी अधिकारी काढून घेत आहेत अंग

महापालिकेसह खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटांचे योग्यप्रकारे वापर रुग्णांसाठी होतो किंवा कसे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खाटांअभावी रुग्णांचे होणारे हाल कमी करण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली या खासगी रुग्णालयांचा कारभार आणल असला तरी प्रत्यक्षा सनदी अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी विभागीय सहायक आयुक्तांच्या खांद्यावर टाकून स्वत: त्यातून अंग काढून घेण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्यावतीने सुरु केलेल्या वॉर रुमच्या माध्यमातूनच या खासगी रुग्णलयांमधील खाटांचे नियोजन करण्याचे आदेश देत या सनदी अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी सहायक आयुक्तांवर सोपवण्यास सरुवात केली आहे. त्यामुळे विभागीय सहायक आयुक्तांवर आधीच कामाचा भार असतानाच सनदी अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी त्यांच्या अंगावर टाकत सहायक आयुक्तांची अवस्था घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी केली आहे.

मुंबईतील ‘कोविड-१९’ची बाधा झालेल्या रुग्णांना अधिकाधिक परिणामकारक वैद्यकीय सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा या महापालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. या खाटांचे रुग्णांना वितरण करण्याचे समन्वयन महापालिकेच्या स्तरावर करण्यात येत आहे. तसेच या ८० टक्के खाटांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार शुल्क आकारणी संबंधित रुग्णालयाद्वारे केली जात आहे. मात्र, खाजगी रूग्णालयामधील खाटांचे वितरण सामान्यातील सामान्य व्यक्तीला अधिक प्रभावीपणे होण्यासह या वैद्यकीय सेवा सुविधा रुग्णांना अधिक परिणामकारकपणे मिळाव्यात, यासाठी सुयोग्य समन्वय साधण्यासाठी ५ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाद्वारे नुकतीच करण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी दरानुसारच शुल्क आकारणी केली जात असल्याची खातरजमा सुयोग्य प्रकारे व्हावी, यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यातील प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांची नियुक्तीही प्रत्येक खासगी रुग्णालयासाठी करण्यात आली आहे. तसेच एखाद्या खासगी रुग्णालयाबाबत रुग्णांना किंवा रुग्णांच्या आप्तांना काही तक्रार किंवा सूचना करावयाची असल्यास त्यासाठीचा पर्याय देखील महापालिकेने उपलब्ध करून दिला आहे. यासाठी संबंधित खासगी रुग्णालयात करिता ज्या सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्याकरता त्यांचे इमेल आयडी तसेच मोबाईल क्रमांकही दिले.

- Advertisement -

मात्र, प्रत्यक्षात आठ दिवस उलटले तरी सनदी अधिकाऱ्यांचा प्रत्यक्षात खासगी रुग्णालयातील खाटांच्या नियोजनाकडे लक्षच दिसून येत नाही. या उलट काही सनदी अधिकाऱ्यांनी, सहायक आयुक्तांना दूरध्वनीवरूनच आदेश देत यापुढे खासगी रुग्णालयातील खाटांचे नियोजन करून त्याठिकाणीही लक्ष दिले जावे, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे काही सहायक आयुक्तांनी तर वॉर्ड रुमशी संलग्नच ही सेवा जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, खासगी रुग्णालयात नेमलेले ऑडीटर हे केवळ बिल तपासण्यापुरतेच असल्याचे सांगत सनदी अधिकाऱ्यांनी हे काम आपल्याच करायचे आहे,असेच निर्देश दिलेले आहे. मात्र, प्रत्यक्षात महापालिका आयुक्तांना याची कल्पनाच नाही.


हेही वाचा – भारत-चीन तणाव : ५०० कोटींची शस्त्रे खरेदी करण्यास सरकारची परवानगी

- Advertisement -

खासगी रुग्णालयांचे व्यवस्थापन हे सहायक आयुक्तांना जुमानणार नाही. त्यामुळेच सनदी अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली या रुग्णालयातील खाटांचे नियोजन करून सहायक आयुक्तांना कोविडसह मान्सुनपूर्व कामांचीही नियोजित जबाबदारी टाकली होती. परंतु आता सनदी अधिकाऱ्यांनीच आता सहायक आयुक्तांनाच खासगी रुग्णालयाच्याती रुग्ण प्रवेश प्रक्रियेसाठी कामाला लावल्याने सहायक आयुक्तांनी नक्की कुठे लक्ष द्यावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिणामी खासगी रुग्णालयावर कोणत्याही प्रकारचा वचक राहिलेला दिसत नसून अनेक रुग्णालयांनी तर आम्हाला सरकारचे अनुदान मिळत नसल्याने आम्हाला सवलतीच्या दरात उपचार करणे परवडत नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे अनेक खासगी रुग्णलयांकडून आजही रुग्णांची लुटमारच सुरुच आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -