घरताज्या घडामोडीजयदेव ठाकरेंच्या मुलाचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा, आणखी एका ठाकरेंचे नाव चर्चेत

जयदेव ठाकरेंच्या मुलाचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा, आणखी एका ठाकरेंचे नाव चर्चेत

Subscribe

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यानंतरही ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. परंतु दसरा मेळाव्याच्या भाषणांसह आता राजकीय वर्तुळात आणखी एका गोष्टीची चर्चा रंगत आहे. ती म्हणजे ठाकरे कुटुंबातील सदस्यांची. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे हे राजकारणात येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच आता जयदेव ठाकरेंच्या मुलाने उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला असून जयदेव ठाकरेंचे चिरंजीव जयदीप ठाकरे हे राजकारणात एन्ट्री करणार असल्याचे चित्र दिसत आहे.

कुटुंबियांसोबत राहणं हे माझं कर्तव्य

- Advertisement -

जयदीप ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, या घराण्यातला मी सर्वात मोठा नातू आहे. मला माझे आजोबा, उद्धव काका आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल खूप आदर आहे. सध्याची परिस्थिती आणि चित्र हे खूप विचित्र आहे. त्यामुळे अशावेळी मी माझ्या कुटुंबियांसोबत राहणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी उद्धव ठाकरेंच्या सभेला गेलो, असं जयदीप ठाकरे म्हणाले.

वडील शिंदे गटात आणि चिरंजीव उद्धव ठाकरे गटात

- Advertisement -

माझं क्षेत्र हे कलेचं आहे आणि तो सुद्धा वारसा माझ्या आजोबांकडून मला मिळाला आहे. मी क्रिएटीव्ह डीरेक्टर म्हणून कामाला आहे. जर मला काम करण्याची संधी मिळाली किंवा पक्षातून एखादी जबाबदारी मिळाल्यास ती मी १०० टक्के स्वीकारेन. तसेच पक्षाला वाढवण्यास मी नक्कीच मदत करेन, असं ठाकरे म्हणाले.

लवकरच त्यांना भेटणार…

आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्या संपर्कात मी नेहमीच असतो. सभेनिमित्त मी उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वांना भेटलो. परंतु त्यांची मी योग्य वेळ घेऊन लवकरच त्यांना भेटणार आहे, असं जयदीप ठाकरे म्हणाले.

दसरा मेळाव्यात ठाकरे कुटुंबातील दोन सदस्यांची वेगवेगळी उपस्थिती पहायला मिळाली. शिंदे गटाच्या मेळाव्याला उद्धव ठाकरेंचे मोठे बंधू जयदेव ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दुसरे बंधू दिवंगत बिंदुमाधव ठाकरेंचे पुत्र निहार ठाकरे, वहिनी स्मिता ठाकरेंनी शिंदे गटाच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. तर शिवाजी पार्कात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्याला जयदीप ठाकरे यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे आता जयदीप ठाकरे राजकारणात एन्ट्री करणार असून त्यांची पुढील भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : नाशकात पुन्हा दुर्घटना! सप्तश्रृंगी गडावर एसटी बसला भीषण


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -