घरमहाराष्ट्र..तर तालिबानने जावेद अख्तर यांना चौकात फटके मारले असते

..तर तालिबानने जावेद अख्तर यांना चौकात फटके मारले असते

Subscribe

भाजप नेते मुनगंटीवारांचं वादग्रस्त वक्तव्य

जावेद अख्तर यांनी भारतात जे वक्तव्य केलं ते त्यांनी तालिबानमध्ये केलं असतं, तर त्यांना तालिबानने चौकात फटके मारले असते, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग यांच्या संदर्भात वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात सध्या भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. या वक्तव्याबद्दल जावेद अख्तर यांनी माफी मागावी, अशी मागणीही भाजपने केलीय. याच पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील जावेद अख्तर यांच्यावर जोरदार टीका केली.

‘मला असं वाटतं हा एक अयशस्वी प्रयत्न आहे. नेहमीच देशाच्या संदर्भात त्यांची भूमिका संशयास्पद राहिलेली आहे. हेच वाक्य तालिबानमध्ये जाऊन, त्यांनी अशा पद्धतीचं एखादं वाक्य वापरलं असतं तर चौकात त्यांना तालिबानी लोकांनी फटके मारले असते’, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली. या ठिकाणी या संस्था आणि संघटना या तालिबान्यांसारख्या वागल्या असत्या, तर जसं अफगाणिस्तानच्या एखाद्या चौकात उभा राहून तालिबान्यांना शिव्या दिल्यानंतर, काय हाल होतात हे तुम्ही पाहिलं असेल. तसे हाल इथे झाले नसते? मात्र, आपल्या देशात ज्यांची सत्ता आहे, ते रामराज्य आणण्याची कल्पना करणारे लोक आहेत. बजरंग दलाबद्दल नाव घेताना, त्यांच्या मनात बजरंग किंवा राम भक्तांबद्दलची असूया अप्रत्यक्ष व्यक्त झाली, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

- Advertisement -

‘आरएसएस, विश्व हिंदू परिषद हे तालिबानी मानसिकतेचे आहेत. त्यांचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. जर संधी मिळाली तर ते सीमाही ओलांडतील’, असे जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यावर भाजप नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत विधाने मागे घेण्याची मागणी केलीय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -