घरताज्या घडामोडीमाणुसकीचं नातं कसं जपावं निलेश लंकेंनी दाखवले, जयंत पाटील यांची कौतुकाची थाप

माणुसकीचं नातं कसं जपावं निलेश लंकेंनी दाखवले, जयंत पाटील यांची कौतुकाची थाप

Subscribe

विनंतीला मान देत अवघ्या दोन दिवसात मंत्री जयंत पाटील पारनेरमध्ये दाखल झाल्याने आमदार निलेश लंके भावूक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये राज्यातील परिस्थिती चिंताजनक झाली होती. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे सर्व रुग्णालये पुर्ण क्षमतेने भरली होती. यामध्ये राजकीय नेत्यांनी कोविड सेंटर उभारली आहेत. परंतु आमदार निलेश लंके यांनी संकटाच्या काळात दुःख वाटून घेतले आहे. माणुसकीचं नातं कसं जपावं हे त्यांनी दाखवले. शरद पवार यांचा कार्यकर्ता म्हणून ते शोभतात असे सांगतानाच जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा पवारसाहेब सामान्यांसाठी धावून जातात त्याचप्रमाणे निलेश लंके काम करत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कौतुक केले आहे.

पारनेर तालुक्याच्या भावळणी येथे आमदार निलेश लंके यांनी शरदचंद्र आरोग्य मंदिर कोविड सेंटर उभारले असून त्याठिकाणीच ते कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांच्या या कामाचे कौतुक करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या कोविड सेंटरला भेट दिली.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाच्या बैठकीदरम्यान आमदार निलेश लंके यांनी मंत्री जयंत पाटील यांना कोविड सेंटरला भेट देण्याची विनंती केली होती. आमदार निलेश लंके यांच्या विनंतीला मान देत अवघ्या दोन दिवसात मंत्री जयंत पाटील पारनेरमध्ये दाखल झाल्याने आमदार निलेश लंके भावूक झाले होते.

काही दिवसांपासून फक्त ऐकूनच होतो मात्र आज भेट दिल्याने आमदार निलेश लंके यांचा अभिमान वाटतो. सर्वांची सेवा करण्याचा ‘पण’ त्यांनी घेतला आहे. १४ एप्रिलपासून झोकून काम करत आहे, लोकांचा आदर्श म्हणून ते उभे राहिले आहे. त्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. सामान्य माणसाची चांगली सेवा आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून होत आहे असं म्हणत जयंत पाटील यांनी निलेश लंके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -