घरदेश-विदेशगायिका कनिका पॉझिटिव्ह राजकीय वर्तुळात तणाव

गायिका कनिका पॉझिटिव्ह राजकीय वर्तुळात तणाव

Subscribe

बॉलिवूड गायिका कनिका कपूर करोना पॉझिटिव्ह असल्याचे कळले तेव्हापासून एक वेगळा तणाव राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. रविवारी येथील गॅलेन्ट अपार्टमेन्टमध्ये कनिकाने खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत देशातील बडे नेते आणि अधिकार्‍यांचा समावेश होता.

सध्या सोशल मीडियावर पार्टीचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये कनिका सर्वांच्या मधोमध बसलेली दिसत आहे. तर तिच्या डाव्या बाजूला राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आहेत. वसुंधरा यांचा मुलगा खासदार दुष्यंत सिंगही या फोटोमध्ये दिसत आहे. कनिका करोना पॉझिटीव्ह असल्याचे कळताच वसुंधरा राजे आणि दृष्यंत यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

भारतीय सेलिब्रिटी करोना पॉझिटिव्ह असल्याचे हे पहिले प्रकरण आहे. दुष्यंत यांनी गुरुवारी संसदेत हजेरी लावली होती. यामुळे टीएमसी खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी संसदेचे चर्चा सत्र स्थगित करण्याची मागणी केली आहे. कनिका १३ आणि १४ मार्च रोजी कानपुरला मामाच्या घरीही गेली होती. हा फोटो तिच्या मामाच्या घरचा आहे. यावेळी ती संपूर्ण कुटुंबासोबत होती. मीडिया रिपोर्टनुसार, पार्टीत उपस्थित सर्व सदस्यांची आता करोना चाचणी करण्यात येणार आहे.

कनिकाविरुद्ध एफआयआर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्थरीय बैठक बोलावली. या बैठकीत बॉलिवूड गायिका कनिका कपूर विरोधात एफआयर नोंदवण्याचे आदेश आदित्यनाथांनी दिले. वस्तुस्थिती लपवल्याबद्दल आणि जनमानसाचे आयुष्य धोक्यात घातल्याबद्दल कनिकाविरोधात एफआयआर नोंदविण्यात येणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -