घरमहाराष्ट्र१८ तासानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवर एकेरी वाहतूक सुरू

१८ तासानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवर एकेरी वाहतूक सुरू

Subscribe

काल रात्रीपासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प होता

कशेडी घाटात गुरुवारी रात्री दरड कोसळल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला होता. दरम्यान, आता तब्बल १८ तासांनी कशेडी घाटात एकेरी वाहतूक सुरु झाली आहे. काल रात्री कशेडी घाटात दरड कोसळल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला होता. ही दरड हटवण्याचं काम रात्रीपासून सुरु झालं असून आज दिवसभर दरड हटवण्याचं काम सुरु आहे.

तब्बल १८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर मुंबई गोवा महामार्गावरील दरड हटविण्यात प्रशासनाला यश आलं असून या मार्गावरून एकेरी वाहतुक सुरु करण्यात आली आहे. यामुळे आता कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्यां प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी संध्याकाळी पोलादपूर जवळील कशेडी घाटात धामणादेवी जवळ दरड कोसळली होती. त्यामुळे महामार्गावरील वाहतुक बंद पडली होती. महामार्ग प्राधिकरण, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने रात्री उशीरा दरड हटवण्याचे काम सुरु करण्यात आलं.

- Advertisement -

महामार्गावरील दरड शुक्रवारी सकाळी हटवण्यात आली असती. मात्र, पावसाचा जोर वाढल्यामुळे कामात अडथाळा निर्माण झाला. पाऊस कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा दरड हटवण्याचं काम सुरु करण्यात आलं. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हे काम पुर्ण झाले. मात्र खबरदारी म्हणून एकेरी वाहतुक सुरु करण्यात आली आहे. पावसाचा जोर कमी झाल्यावर उर्वरीत काम पुर्ण करून दुहेरी वाहतूक सुरु करण्यात येणार आहे.


हेही वाचा – कल्याण डोंबिवलीतही लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढवला!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -