घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये १७४ नवे रुग्ण कोरोनाबाधित

नाशिकमध्ये १७४ नवे रुग्ण कोरोनाबाधित

Subscribe

नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि.८) दिवसभरात 174 नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक ग्रामीण 48, नाशिक 125 आणि मालेगावातील १ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामध्ये नाशिक शहर ५ आणि नाशिक ग्रामीणमधील १ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 6 हजार 479 रूग्ण असून एकट्या नाशिक शहरात 3 हजार 720 रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आजवर 4 हजार 47 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण 911, नाशिक शहर 2125, मालेगाव 913 आणि जिल्ह्याबाहेरील 9८ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या 2 हजार १२० रूग्ण उपचार घेत आहेत. यात नाशिक ग्रामीण 528, नाशिक शहर 1441, मालेगाव 126 आणि जिल्ह्याबाहेरील 2५ रूग्ण आहेत. बुधवारी दिवसभरात 577 संशयित रूग्ण दाखल झाले. यात जिल्हा रूग्णालय २०, नाशिक महापालिका रूग्णालय ३११, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय ९, मालेगाव रूग्णालय २७, नाशिक ग्रामीण रूग्णालयात २१० रूग्ण दाखल झाले.

- Advertisement -

नाशिक कोरोना अपडेट
पॉझिटिव्ह रूग्ण-6479 (मृत-312)
नाशिक ग्रामीण-1505 (मृत-66)
नाशिक शहर-3720 (मृत-154)
मालेगाव शहर-1118 (मृत-79)
जिल्ह्याबाहेरील-136 (मृत-13)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -