घरमहाराष्ट्रमहाबळेश्वरमध्ये बहरला कश्मिरी केशर

महाबळेश्वरमध्ये बहरला कश्मिरी केशर

Subscribe

केशरच्या कंदाना फुले आल्यामुळे हा प्रयोग यशस्वी ठरत आहे.

महाराष्ट्रातील मिनी काश्मिर आणि स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असेल्या महाबळेश्वरमध्ये केशरची लागवड यशस्वी झाली आहे. महाबळेश्वर, पाचगणीत काही महिन्यांपूर्वी केशरची लागवड करण्यात आली होती. त्या केशरची कंद आता फुलांनी बहरले आहेत. काश्मिरच्या किश्तवाड येथून आणलेली केशरची कंदे महाबळेश्वर तालुक्यातील क्षेत्र महाबळेश्वर आणि मेटगुताड येथे प्रायोगिक तत्वावर लावण्यात आली होती. महाबळेश्वरचे वातावरण केशर लागवडीसाठी अनुकूल असल्यामुळे केशरची लागवड करण्यात आली होती. महाबळेश्वरमध्ये केशरच्या कंदाना फुले आल्यामुळे हा प्रयोगिक यशस्वी ठरत आहे. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीसह केशरचे उत्पादन घेण्याचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.

महाबळेश्वरमध्ये लागवड केलेल्या केशरच्या कंदाची योग्य पद्धतीने लागवड आणि जोपासना केल्यामुळे हा प्रयोग यशस्वी ठरताना दिसत आहे. देशात केशरची लागवड जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड आणि कोमपूर येथे मोठ्या प्रमाणात केली जाते. महाबळेश्वर कृषी विभागाने केशरची लागवड महाराष्ट्रात व्हावी म्हणून प्रयोगाकरिता ४५० कंद प्रति ५० रुपये दराने आणली होती.

- Advertisement -

महाबळेश्वरमधील श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे लागवड केलेल्या कंदाना फुले आली आहेत. त्यामुळे आता महाबळेश्वरातही केशर लागवड करु शकतो असा विश्वास असल्याचे कृषी सहायक दिपक बोर्डे यांनी सांगितले.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -