घरताज्या घडामोडीएकनाथ खडसे तब्बल ९ तासाच्या चौकशीनंतर ईडी कार्यालयातून पडले बाहेर

एकनाथ खडसे तब्बल ९ तासाच्या चौकशीनंतर ईडी कार्यालयातून पडले बाहेर

Subscribe

येत्या १० दिवसांत ईडीला असलेली आवश्यक कागदपत्र देण्यात येणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ईडीने आज गुरुवार ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. एकनाथ खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. तब्बल ९ तासाच्या चौकशीनंतर ईडी कार्यलायतून एकनाथ खडसे बाहेर पडले आहेत. ईडीने एकनाथ खडसे यांची ९ तासांची मॅरेथॉन चौकशी केली असल्याची माहिती मिळाली आहे. एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी सांगितले आहे की, येत्या १० दिवसांत ईडीला असलेली आवश्यक कागदपत्र देण्यात येणार आहेत. भोसरी भूखंड प्रकरणात आपला वैयक्तिक संबंध नसल्याचे एकनाथ खडसे यांनी ईडी चौकशीत सांगितले असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे.

काय म्हणाले खडसेंचे वकिल

एकनाथ खडसे यांच्या चौकशीनंतर त्यांच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडीने खडसेंची भोसरी भूखंड प्रकरणी चौकशी केली आहे. चौकशीदरम्यान खडसेंच्या सर्व मालमत्ताबाबत चौकशी करण्यात आली. ईडीला पाहिजे असलेले सर्व कागदपत्र देण्यात आले असून अजून काही कागदपत्र येत्या १० दिवसांत देणार आहे. तसच गरज भासल्यास चौकशीला उपस्थित राहिल असं खडसेंनी इडीला सांगितले असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे.

- Advertisement -

खडसे काय म्हणाले

एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावले आहेत. चौकशीला हजर राहण्यापुर्वी खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसेंनी म्हटलंय की, भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे माझ्या चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. ही चौकशी संपुर्ण राजकीय हेतूने करण्यात येत आहे. नाथाभाऊना कुठून तरी छळावं, नाथाभाऊंना अडकवण्यात यावं असा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. मागील ८ दिवसांपासून जळगाग जिल्ह्यात सर्वांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर फिरतंय की, अभी कुछ तो होने वाला है? ज्या अर्थी हे कार्यकार्त्यांच्या ग्रुपवर फिरत आहे म्हणजे हे षडयंत्रच आहे. परंतु त्याला आपण सामोरे जायला तयार आहे. असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

प्रकरण काय आहे?

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील भोसरी भूखंड एकनाथ खडसे यांनी खरेदी केला होता. एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना भोसरी भूखंड हा पत्नी मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी ३ कोटी ७५ लाख रुपयांना खरेदी केली होती. सर्वे क्रमांक ५२ मधील ३ एकर जागा त्यांनी खरेदी केली. जमिनीची स्टॅम्प ड्युटी म्हणून १ कोटी ३७ लाख रुपयेही भरण्यात आले. सदर जमीन एमआयडीसीच्या मालकीची आहे. व ती ९९ वर्षांच्या कराराव खरेदी करण्यात आली असल्याचे एमआयडीसीकडून सांगण्यात आले आहे. एकनाथ खडसे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन जमीन खरेदी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

- Advertisement -

खडसेंच्या जावयाला अटक

एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सोमवारी ईडीने समन्स पाठवले होते. गिरीश चौधरी यांची उशीरा रात्रीपर्यंत चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. खडसेंच्या कन्येचीही ईडीने आज गुरुवार ८ जुलैला केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -