घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रखरेंचे खोटे कारनामे : सतीश खरेच्या घरात डमी कार्यालय; सापडली आक्षेपार्ह शेकडो...

खरेंचे खोटे कारनामे : सतीश खरेच्या घरात डमी कार्यालय; सापडली आक्षेपार्ह शेकडो कागदपत्रे, बँकेचे लॉकर मात्र…

Subscribe

नाशिक : लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतीश खरेचे घर म्हणजे जणू डमी कार्यालयच असल्याचे तपासात समोर आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागास पथकास घरझडतीमध्ये शेकडो कागदपत्र्यांच्या फाईल्स सापडल्या आहेत. या फाईल्समध्ये बदली आदेशासह जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संबंधित कागदपत्रांच्या झेरॉक्स आहेत. पथकास त्याची आणखी सहा बँक खाती आढळून आली आहेत.

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडून आलेल्या संचालकाविरुद्ध दाखल प्रकरणावर तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी खरे याने ३० लाखांची लाच कॉलेज रोडवरील फ्लॅटमध्ये घेतली. त्यावेळी त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तपासात खरे याच्याकडे बेहिशेबी रोख रक्कम, दागिने, मालमत्ता आढळून आली आहे. खरे याला सहकार व पणन विभागान तीन महिन्यांसाठी निलंबित केले असून, त्याच्या निलंबनाचे आदेश काढला आहे. या कालावधीत ५० टक्के निर्वाहभत्ता देय असणार आहे. दरम्यान, या कालावधीत खरे यास कोणत्याही प्रकारचा व्यवसाय अथवा नोकरी करता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.

- Advertisement -

अहो आश्चर्यम्, तीनही लॉकर रिकामे!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याची ११ बँक खाती शोधून काढली. यातील ८ खात्यातून ४३ लाख रुपये असून, ते जप्त करण्यात आले आहेत. पथकाकडून त्याच्या घराची पुन्हा झडती घेण्यात आली. त्यावेळी पथकास आणखी सहा बँक खात्याची माहिती मिळाली. या बँक खात्यासंदर्भात संबंधित बँकांना खाती सील करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खरे यांच्या एका सहकारी बँकेतील लॉकर्स चावी नसल्याचे तोडून उघडण्यात आले. दहा वर्षांपूर्वीपासूनचे ते लॉकर्स होते. मात्र, त्यात तपासी पथकास आढळून काही आले नाही. लॉकरमध्ये पैसे ठेवायचे नव्हते तर खरेने ते घेतलेच कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या लॉकरमधील पैसे कारवाईनंतर नातेवाईकांनी गायब केली की लॉकर आधीपासून रिकामेच होते याचा तपास आता केला जाणार आहे. तसेच तपासी पथकाने खरे यांच्या राहत्या घराची झडती घेतली. दिवसभर सुरू असलेल्या झडतीसत्रामध्ये शेकडे कागदपत्रे सापडली. यामध्ये काही आक्षेपार्ह कागदपत्र आहेत. त्यामुळे खरेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

एक दिवसाची पोलीस कोठडी वाढली

सतीश खरे याच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी (दि १९) संपली. त्यामुळेे त्यास पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी (द. २०) पुन्हा त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यात त्याला न्यायालयीन कोठडी मिळेल का याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -