घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलाचखोर जिल्हा हिवताप अधिकार्‍याच्या लॉकर्समध्ये सापडले घबाड

लाचखोर जिल्हा हिवताप अधिकार्‍याच्या लॉकर्समध्ये सापडले घबाड

Subscribe

नाशिक : लाचखोर जिल्हा हिवताप महिला अधिकार्‍याच्या लॉकर्सची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपासणी केली असता त्यामध्ये लाखो रुपयांचे सोने आढळून आले आहे. या सोन्याची शुक्रवारी (दि.१९) दिवसभर पथकाकडून मोजणी सुरु होती. महिला अधिकार्‍याकडे लाखो रुपयांचे सोने कोठून आले आहे, याचा शोध पथकाकडून घेतला जात आहे. महिला अधिकार्‍यासह दोन आरोग्यसेवकांची पोलीस कोठडीची शनिवारी मुदत संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली दगडू पाटील (४९, रा. स्टेटस रेसिडेन्सी, गंगापूर, नाशिक), संजय रामू राव (४६, पाथर्डी फाटा, नाशिक), कैलास गंगाधर शिंदे (४७, पांडवनगरी, नाशिक) अशी तिघा लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदार आरोग्यसेवकाचे मासिक वेतन काढून देण्यासाठी १० हजारांची लाच घेतलेल्या स्विकारल्याप्रकरणी तिघांना जिल्हा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तिघा लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. १७) लाच घेतना अटक केली. पथकाने तिघांच्याही घरांची झडती घेतली. लाचखोर वैशाली पाटील हिच्या मालमत्तेची माहिती घेतली जात आहे. वैशाली पाटील यांच्या लॉकर्समध्ये लाखो रुपयांचे सोने आढळून आल्याची माहिती सुत्रांनी दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक साधना इंगळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -