घरताज्या घडामोडी'त्या' हेलिकॉप्टरची तळोजा परिसरात चर्चा, एकाच ठिकाणी मारल्या १०-१५ घिरट्या

‘त्या’ हेलिकॉप्टरची तळोजा परिसरात चर्चा, एकाच ठिकाणी मारल्या १०-१५ घिरट्या

Subscribe

तळोजा परिसरात सध्या एका हेलिकॉप्टरची चर्चा आहे. काहीतरी साहित्य लटकावलेल्या अवस्थेत आणि दिवसभरात दहा ते पंधरा फेऱ्या मारणाऱ्या या हेलिकॉप्टरचे दर्शन तळोजा परिसरात झाले. परंतु हेलिकॉप्टरला हे लटकावलेले साहित्य नक्की काय आहे? आणि हे साहित्य वाहून नेण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर का केला जातोय?, असा सवाल तळोजा परिसरातील नागरिकांनी उपस्थित केलाय.

हेलिकॉप्टरच्या साहाय्याने या साहित्याची वाहतूक केली जात असल्याचे पहिल्यांदाच पाहणाऱ्या काही जुन्या जाणत्यांच्या मनात शस्त्रास्त्र फेकण्याच्या शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. कारण पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शस्त्रास्त्र फेकण्यात आल्याच्या 1995 सालच्या घटनेची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे.

- Advertisement -

नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत असलेल्या या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला असता, मिळालेल्या माहितीनुसार पनवेल परिसरातील डोंगर रागांमध्ये सध्या टाटा पावर कंपनीच्या उच्च दाबाच्या वाहिन्या वाहून नेण्यासाठी वापरात येत असलेल्या टॉवरचे काम सुरु आहे. त्यामुळे या टॉवरसाठी लागणाऱ्या लोखंडी साहित्याची वाहतूक या हेलिकॉप्टरमधून केली जात असल्याचं सांगितलं जात आहे.


हेही वाचा : पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंसारखं निर्भीड वागावं ही अपेक्षा, संजय राऊतांचा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -