घरताज्या घडामोडीघोटाळा उघड होण्याच्या भीतीने कोर्लईत गावबंदी, सोमैय्यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

घोटाळा उघड होण्याच्या भीतीने कोर्लईत गावबंदी, सोमैय्यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

Subscribe

कोर्लई गावातील लॉकडाऊनचे आदेश बेकायदेशीर

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी कोर्लई गावात जाणूनबुजून गावबंदी केली असल्याचा आरोप केला आहे. कोर्लईतील मुख्यमंत्र्यांच्या १९ बंगल्यांचा घोटाळ्याच्या पाठपुरावा करण्यासाठी येणार असल्याचे प्रशासनाला सांगण्यात आले. यामुळे प्रशासनाने १०० दिवसांची गावबंदी, घरबंदीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रविंद्र वायकर यांच्या १९ बंगल्यांचा घोटाळ्याचा पाठपुरावा माजी खासदार किरीट सोमय्या करत आहेत. गावात येऊ नये यासाठी कोरोनाचे कारण देऊन गावबंदीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अजीबो गरीब आदेश काढला आहे. त्यांचे जे एकोणीस बंगल्यांचे घोटाळ्याचे गाव असलेल्या कोर्लई गावात १०० दिवसांसाठी लॉकडाऊन केला आहे. गावात शेवटचा कोरोना रुग्ण बरा होऊन नंतर २८ दिवसांपर्यंत लॉकडाऊन असा आदेश जारी केला आहे. याचे कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले होते. यामुळे हा आदेश दिला आहे. महाराष्ट्रात कोणत्याही ठीकणी असा आदेश निघालेला नाही आहे. कोरोनाचा उपचार करा परंतु घोटाळा लपवण्यासाठी कोर्लई गावाच्या लोकांवर अत्याचार आम्हाला मान्य नाही असे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

दम्यान माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमैय्या यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांचा बंगल्याच्या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी येणार असल्याचे १ जून रोजी तहसीलदारांना कळवले होते. परंतु प्रशासनाने ४ जूनला गावबींदीचा आदेश काढला असल्याचे कागदपत्र पाठवले आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावबंदीचे आदेश दिले आहेत. गावातून बाहेर जाण्यास तसेच इतर गावातून कोर्लईत प्रवेश करण्यास बंदी आहे. गावातील शेवटचा कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतर २८ दिवसांनंतर लॉकडाऊन उठवला जाणार असल्याचे सांगितले आहे. अशी माहिती किरीट सोमैय्या यांनी दिली आहे.

- Advertisement -

गावबंदीचे आदेश बेकायदेशीर

अलिबागमधील कोर्लई गावात घरबंदी आणि गावबंदीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात अजून कोणत्याही गावात अशा प्रकारचे आदेश दिले गेले नाही. असा आदेश कोणत्या कायद्यांतर्गत देण्यात आले आहेत. अशा प्रकारे कुठे गावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत ते दाखवून द्यावे? कोर्लई गावातील लॉकडाऊनचे आदेश बेकायदेशीर असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -