घरताज्या घडामोडीअजित पवारांच्या अडचणीत वाढ, सोमय्यांनी कारखाना घोटाळ्याचे कागदपत्र ईडीकडे केली सादर

अजित पवारांच्या अडचणीत वाढ, सोमय्यांनी कारखाना घोटाळ्याचे कागदपत्र ईडीकडे केली सादर

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याबाबतचे कागदपत्र ईडीकडे सादर केले आहेत. अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावर बेनामी पद्धतीने ताबा मिळवला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच अजित पवारांनी स्वतःच्या कंपनीला गुरु कमोडीटी नाव का दिले असा प्रश्न सोमय्यांनी केला आहे. ईडीचे अधिकारी दिलेल्या कागदपत्रांवर चौकशी करत असल्याची माहिती सोमय्यांनी दिली आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कारखान्यातील घोटाळ्याबाबतचा पुरावा सादर केला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना कागदपत्रे दिली असून पुढील कारवाई करण्याची मागणी केली आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री झाल्यापासून हजारो कोटींची माया गोळा केली असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.

- Advertisement -

ईडीच्या अधिकाऱ्यांना कागदपत्र सादर केल्यानंतर सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधताना सोमय्या म्हणाले की, अजित पवार यांनी जे बेनामी पद्धतीने जरंडेश्वरवर कब्जा घेतला. गुरु कमोडीटी हा कोणी व्यक्ती आहे का?, अजित पवारांनी स्वतःच्या कंपनीला गुरु कमोडीटी का नाव दिले. एका बाजूला गुरु कमोडीटीमध्ये लेयर उभे केले. दुसऱ्या बाजूला जरंडेश्वर साखर कारखान्यात लेयर उभे केले. फक्त एवढेच नाही तर कारखाना चालवण्यासाठी त्यांनी जे सध्या २ आयकर विभागाच्या धाडी पडल्या त्यात जे दोन मोठे बिल्डर आहेत. जे शरद पवार यांनी सांगितले आहे. त्यांच्याकडे माया सापडली त्यांनी अजित पवारांना १०० कोटी रुपये २००८ साली दिले. व्याज नाही काही नाही फक्त असेच एक रुपयाचा व्याज नाही दिले. आजही ते पैसे तसेच अजित पवारांकडे पडून आहेत. हा सगळा घोटाळा हायकोर्टात रिपोर्टमध्ये देण्याचा आग्रह केला असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

कारखाना चालूच राहणार

जरंडेश्वर साखर कारखान्याचे मूळ संस्थापक जे २७ हजार शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आले आहेत. कारखाना चालू आहे चालूच राहणार आहे. कामगारांना काम चालू राहणार आहे. शेतकरी सुरक्षित आहेत पंरतु जे लुटारु स्वतः उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, बँकेचे इनचार्ज, स्वतःच प्रकरण हाताळताना कारखाना स्वतःकडे घेतला. त्याच बरोबर अजित पवारांनी १ हजार कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती बेनामी पद्धतीने गोळा केली. हे मुद्दे ईडीकडे मांडले असून मला विश्वास आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळेल असे सोमय्या यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

अजित पवारांवर हल्लाबोल

अजित पवारांनी आयकर विभागाच्या पहिल्या दिवशी डोळ्यात पाणी आणून म्हटले की, माझ्या बहिणींच्या घरी छापेमारी केली. यांच्या बहिणीच या कारखान्याच्या मालक आहेत. अजित पवारांनी संपत्ती बहिणीच्या नावाने उभी केली, बहिणीला फसवले की बहिणीच यामध्ये कारखान्याच्या मालक आहेत असा प्रश्न सोमय्या यांनी केला आहे.


हेही वाचा : अजितदादा परवानगी द्या, त्या सोमय्याला बघूनच घेतो; शशिकांत शिंदे आक्रमक


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -