सहीचा कागद दाखवल्यानंतर पवारांना कोणीच वाचवू शकत नाही, सोमय्यांचा अजितदादांना इशारा

kirit somaiya warning on expose ajit pawar new scam

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला आहे. अजित पवारांच्या विरोधातील एक नमुणा जनतेला दाखवल्यानंतर त्यांना आता कोणीच वाचवू शकणार नाही असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. तसेच ठाकरे आणि पवारांनी मागील दीड वर्षांच्या काळात अमाप घोटाळे केले आहेत. त्यामुळे त्यांना आता कोणीही वाचवू शकणार नाही. माँ का बुलावा आया है, आर्थर रोड जेल जानाही पडेगा असा इशारा भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या सर्वांना सोमय्यांनी दिला आहे. किरीट सोमय्या पुण्यात दुपारी १ वाजता उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सहीचा एक कागद दाखवून घोटाळा बाहेर काढणार आहेत.

माजी खासदार किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सोमय्यांनी निशाणा साधला आहे. अजित पवारांच्या जरंडेश्वर कारखान्याला भेट देऊन घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर आता अजित पवारांच्या सहीचा कागद दाखवून आणखी एक घोटाळा जनतेसमोर आणणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटलं आहे. अजित पवारांचे जे साम्राज्य आहे. एवढी जमीन, समृद्धी संपत्ती की किरीट सोमय्यांना पाहायला यायला हवं अशी चर्चा सुरु आहे., पवार घरण्यातील कारस्थानाचा नमुना समोर ठेवणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. राज्यात ठाकरे पवार यांनी स्वतःच अमाप घोटाळे केले आहेत त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही असे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

मॉं का बुलावा आया है, आर्थर रोड जानाही पडेगा

सोमय्यांनी म्हटलं आहे की, भावना गवळींच्या ट्रस्टमध्ये २२ कोटीचा घोटाळा सापडला आहे. तो उद्धव ठाकरेंना दिसत नाही?. अनिल परबांचा रिसॉर्ट अनधिकृत आहे पाडले पाहिजे उद्धव ठाकरेंच्या मंत्रालयाने, पर्यावरण मंत्रालयाने, महसूल मंत्रालयाने रिपोर्ट दिला आहे मग मुख्यमंत्री ठाकरे साहेब कारवाई करत नाही. भावना गवळींवर खोटी एफआयआरचा आरोप आहे. अजित पवारांनी जे केलंय त्यावर शरद पवार का कारवाई करत नाही. भावना गवळींनी १०० कोटींचा घोटाळा केला आहे. सर्व पुरावे समोर आले आहेत. कार्यालयात २५ कोटींची रक्कम ठेवली असल्याचे भावना गवळींनी स्वतः सांगितले आहे. किती दिवस, भावना गवळी, आनंदराव अडसूळ, जितेंद्र आव्हाड, अनिल परब किंवा हसन मुश्रीफ किती दिवस पळणार अखेर मॉं का बुलावा आया है, आर्थर रोड जानाही पडेगा असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

मुश्रीफांविरोधात चौकशी करण्याचे निर्देश

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील घोटाळ्यांची चकशी करण्याचे निर्देश अँटी करप्शन ब्यूरोने दिले असल्याचे सोमय्यांनी सांगितले आहे. हसन मुश्रीफांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर आता डीजीपी यांनी अँटी करप्शन ब्युरोला चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. १ वाजता अधिकारी येणार आहेत. त्यांना अधिक माहिती पाहिजे हसन मुश्रीफ यांनी भ्रष्टाचार कसा केला याबाबतची माहिती पाहिजे असून त्यांना ती माहिती देणार असल्याचे सोमय्यांनी सांगितले आहे.


हेही वाचा : चीन-पाकड्यांचा हैदोस पण सरकार सुस्त; शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्त्र