घरताज्या घडामोडीViral Video : छातीत कळ आल्यास पेट्रोल पंप मालक जबाबदार नाही

Viral Video : छातीत कळ आल्यास पेट्रोल पंप मालक जबाबदार नाही

Subscribe

आपल्या क्रिएटीव्हीटीला कोण कुठे जागा देईल याचा नेम नाही. कोल्हापुरातल्या कोरगावकर सन्सच्या मालकीच्या पेट्रोल पंपावरील भन्नाट मॅसेज हा सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात पेट्रोलच्या दरामुळे जोरदार चर्चा होत आहे. त्यामध्ये हा व्हायरल होणारा व्हिडिओ सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. पेट्रोल पंपाच्या दर्शनी भागातच लावण्यात आलेल्या डिजिटल बोर्डवरील हा मॅसेज चांगलाच व्हायरल झाला आहे. या डिजिटल बोर्डमधून देण्यात आलेला संदेश हा एक प्रकारे इंधन खरेदी करणाऱ्यांना अलर्टच्या रूपात देण्यात आलेला आहे.

काय आहे डिजिटल व्हायरल मॅसेज ?

कोल्हापूरच्या पेट्रोलपंपर लिहिण्यात आलेल्या डिजिटल मॅसेजमध्ये म्हटले आहे की, पेट्रोलचे दर स्वतःच्या जबाबदारीवर पहावेत. छातीत कळ आल्यास पेट्रोल पंप मालक जबाबदार राहणार नाही – पेट्रोलपंप मालक संघटना
या मॅसेजनंतर बोलतीबंदच्या स्मायलिजचा वापर करण्यात आला आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

पेट्रोल पंपावर मोदींच्या फोटोवरही राजकारण्यांची टीका

पेट्रोल पंपवर दिसणाऱ्या मोदींच्या फोटोवर आतापर्यंत अनेक राजकीय मंडळींकडून टीका करण्यात आली आहे. त्यामध्ये नव्यानेच पदभार स्विकारलेले कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही टीका केली आहे. अमिताभ आणि अक्षय कुमार यांनी याआधी पेट्रोलच्या किंमत ७० रूपये असताना नाराजी व्यक्त केली होती. पण आता पेट्रोल १०० रूपयांवर गेल्यानंतरही मोदी सरकार विरोधात बोलण्याची हिंमत कोणीही करत नाही अशी टीका कॉंग्रेसच्या नाना पटोले यांनी केली आहे. मोदी सरकारच्या हुकुमशाहीविरोधात बोलण्याची कोणाचीच हिंमत का नाही ? असाही सवाल करण्यात आला आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -