घरताज्या घडामोडीHasan Mushrif: हसन मुश्रीफांविरोधात तक्रार दाखल करण्यास पोलिसांचा नकार

Hasan Mushrif: हसन मुश्रीफांविरोधात तक्रार दाखल करण्यास पोलिसांचा नकार

Subscribe

राज्यातील राजकारणात सतत आरोप-प्रत्यारोपचे सत्र सुरू आहे. यामुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्ताने आलेल्या जाहिरात आणि पोस्टरवरून नवा वाद पेटला आहे. या जाहिरात आणि पोस्टरमध्ये हसन मुश्रीफांच्या नावासोबत प्रभु श्री रामाचे नाव जोडल्यामुळे भाजप आक्रमक झाले आहे. याप्रकरणी कागल पोलिसात तक्रार दाखल करताना भाजपचे नेते समरजीत घाटगे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत मोर्चा काढला. पण याप्रकरणी मुश्रीफांविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल करण्यासाठी नकार दिला. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना समरजीत घाटगे रामनवमीला जन्माला आल्याचा मुश्रीफांचा दावा खोटा असल्याचे सांगितले.

पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्यानंतर समरजीत घाटगे म्हणाले की, ‘पोस्टरवर नावासोबत राम आणि नवमी लिहायले आहे. हे काय राम आहेत का? मुश्रीफ नवमी झाली का? आज आपण एवढे मोठे झालोय का? याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे. याबाबत अधिक माहिती घेतो आणि तपास करतो असे पोलिसांनी सांगितले आहे. पुरावे देऊनही तक्रार दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.’

- Advertisement -

पुढे घाटगे म्हणाले की, ‘२४ मार्च १९५४ साली मुश्रीफांचा जन्म झाला आहे. हसन मुश्रीफांचा रामनवमीला जन्माला आल्याचा दावा खोटा आहे. ४० वर्ष मुश्रीफ खोटे बोलले आहेत. हा अखंड बहुजन समाजाचा अपमान आहे. हे आम्ही सहन करणार नाही.’


हेही वाचा – Hasan Mushrif : हसन मुश्रीफांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवरून नवा वाद; हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप आक्रमक


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -