घरमहाराष्ट्रसाताऱ्यात महिला पोलिसाची आत्महत्या

साताऱ्यात महिला पोलिसाची आत्महत्या

Subscribe

साताऱ्यामध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वैयक्तिक कारणातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. स्वाती निंबाळकर असं या महिला पोलिसाचे नाव असून त्या अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. सातारा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

साताऱ्यामध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. स्वाती निंबाळकर असं या महिला पोलिसाचे नाव असून त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली. वैयक्तीक कारणातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. साताऱ्यातील कोंडवे गावातील ही घटना आहे. २२ जून रोजी त्यांनी विष प्राशन केले होते. त्यानंतर उपचारासाठी त्यांना साताऱ्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. स्वाती निंबाळकर या मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. आत्महत्येपूर्वी स्वाती यांनी पत्र लिहले होते. त्यामध्ये त्यांनी तणावामध्ये असल्याचे लिहिले आहे. कडधान्यांला किड लागू नये यासाठी लावली जाणारी पावड खाऊन त्यांनी आत्महत्या केली. स्वाती यांचे पती आर्मीमध्ये कार्यरत आहे. दरम्यान या घटनेचा तपास सातारा पोलीस करत आहेत.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -