Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' आशा भोसलेंना जाहीर

यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ आशा भोसलेंना जाहीर

Subscribe

यंदाच्या 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. गायिका उषा मंगेशकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.

यंदाच्या ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. गायिका उषा मंगेशकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. शिवाय, विद्या बालन, पंकज उदास, प्रसाद ओक यांच्यासह अनेकांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. (lata dinanath mangeshkar award 2023 has been announced to asha bhosle)

दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८१ व्या स्मृतिदिनानिमित्त नुकतंच एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. या प्रसिद्धीपत्रकानुसार यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे. तर चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेता प्रसाद ओकला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेत्री विद्या बालन विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.

- Advertisement -

मंगेशकर कुटुंब गेल्या ३३ वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे हा सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट चालवत आहेत. मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो.

येत्या २४ एप्रिल २०२३ रोजी यंदाचा प्रतिष्ठित दीनानाथ पुरस्कार आणि ट्रस्टच्या इतर पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडणार आहे. मुंबईतील सायन याठिकाणी असणाऱ्या श्री षण्मुखानंद हॉल इथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

- Advertisement -

गतवर्षीपासून, मंगेशकर कुटुंबीय आणि ट्रस्टकडून भारतरत्न लता दीदींच्या स्मरणार्थ ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ दिला जातो. हा पुरस्कार दरवर्षी फक्त एकाच व्यक्तीला दिला जातो. आपल्या राष्ट्रासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जाणार आहे.

गेल्यावर्षी या पुरस्काराचे मानकरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले होते. यावर्षी ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ लतादीदींच्या लहान बहिणीला अर्थात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना दिला जाणार आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

  • विशेष वैयक्तिक पुरस्कार- पंकज उदास (भारतीय संगीत),
  • सर्वोत्कृष्ट नाटक- प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनचे गौरी थिएटर्सचे ‘नियम व अटी लागू’
  • श्री सदगुरु सेवा संघ ट्रस्ट- (समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवा)
  • वागविलासिनी पुरस्कार – ग्रंथाली प्रकाशन – (साहित्य क्षेत्रात समर्पित सेवा)
  • विशेष पुरस्कार – श्री.प्रसाद ओक (चित्रपट आणि नाटक क्षेत्रात समर्पित सेवा)
  • विशेष पुरस्कार- विद्या बालन (चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवा)

हेही वाचा – आम्ही सगळे महाविकास आघाडीचे चौकीदार आहोत – संजय राऊत

- Advertisment -