राष्ट्रवादीचा एमआयएमला झटका, लातूरमधील ५ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

MIM Five corporators join NCP in presence of ajit pawar jayant patil
राष्ट्रवादीचा एमआयएमला झटका, लातूरमधील ५ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसने लातूर उदगीर नगरपंचायतमध्ये एमआयएमला मोठा झटका दिला आहे. राष्ट्रवादीमध्ये लातूर उदगीरमध्ये एमआयएमच्या ५ नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. नगरसेवकांसह त्यांच्या समर्थकांनीसुद्धा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे लातूर उदगीरमध्ये भाजप आणि एमआयएमला चांगलाच फटका बसणार आहे. राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या नेतृत्वात या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादी नेते नवाब मलिक, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजप सत्तेत राहण्यासाठी एमआयएमचा वापर करत असल्याचे एमआयएमच्या नेत्यांच्या लक्षात आलं आहे. एमआयएमच्या माध्यमातून मत विभाजण करण्यात येत आहे. यामुळे भाजपला विजयी होण्यासाठी मदत होत असल्याचे एमआयएमच्या नेत्यांना कळून चुकले आहे. यामुळेच एमआयएमचे कार्यकर्ते आता पक्षातून बाहेर पडून राष्ट्रवादीत येत आहे. राष्ट्रवादीची राज्यात ताकद वाढत चालली आहे. अल्पसंख्यांक बांधवांनी असाच पाठिंबा दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

या नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या पुढाकाराने एमआयएम पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सय्यद ताहेर हुसेन यांच्यासह लातूर नगरपंचायतीमधील अनेक नगरसेवकांनी आज पक्षप्रवेश केला आहे. यामध्ये एमआयएम लातूर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सय्यद ताहीर हुसेन, नगरसेवक जरगर शमशोद्दीन, नगरसेवक शेख फयाज नसोरोद्दिन, नगरसेवक हाश्मी इमरोज नुरोद्दीन, नगरसेवक इब्राहिम पटेल, शेख अहेमद सातसैलानी, महंमदरफी, सय्यद अन्वर हुसेन, शेख अजीम दायमी, सय्यद सोफी आणि शेख अबरार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर पाटील, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आदी उपस्थित होते.


हेही वाचा : मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा; तूर्त अटक न करण्याचे ईडीला निर्देश