घरमहाराष्ट्रबुरखाधारी मुलीसोबत चित्रपट पाहणाऱ्या मुलांना मारहाण; नेमकं प्रकरण काय?

बुरखाधारी मुलीसोबत चित्रपट पाहणाऱ्या मुलांना मारहाण; नेमकं प्रकरण काय?

Subscribe

बुरखाधारी मुलीसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या मुलांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार लातूरच्या उदगीर येथून समोर आला आहे. या घटनेनंतर आता पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून काही तरुणांना ताब्यात घेतलं आहे.

बुरखाधारी मुलीसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या मुलांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार लातूरच्या उदगीर येथून समोर आला आहे. या घटनेनंतर आता पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून काही तरुणांना ताब्यात घेतलं आहे. परंतु मारहाण करणाऱ्या तरुणांच्या समाजाकडून आंदोलन केले जात आहे. ( Latur Udgir Boys watching movies with veiled girl beaten What exactly is the case )

नेमकं प्रकरण काय ?

एक अल्पवयीन जोडपं बुरखा घालून काही मित्रांसोबत चित्रपट पाहायला गेलं होतं. बुरखा घातलेल्या मुलीसोबत काही मुलं चित्रपट पाहात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या मुलांनी चित्रपटगृहात पोहचून त्यांना मारहाण केली. तसंच, नंतर रिक्षामधून अंड्याच्या दुकानात नेऊन पुन्हा मारलं. मारहाणीचे व्हिडीओदेखील काढले. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलांनी त्यांच्या पालकांना झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीसांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेचच चार आरोपींना अटक केली. दरम्यान, या प्रकरणी खोटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोप करत दोन दिवसांपासून समाजातील काही लोक उदगीर शहर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत आहेत.

- Advertisement -

या घटनेमुळे सध्या उदगीरमध्ये आता तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या घटनेला वेगळं वळण लागत असल्याचं म्हटलं जात आहे. एका गटाने केलेल्या दाव्यानुसार, आरोपी तरुणांनी बुरखा का घातला म्हणत अल्पवयीन जोडप्याला मारहाण केली. त्याशिवाय त्यांना बळजबरीने धार्मिक स्थळी नेत धर्मातराचा प्रयत्न झाला. यातील बारा आरोपींपैकी फक्त चारच आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

( हेही वाचा: पंतप्रधान मोदी यांनी शिंदे-फडणवीस यांना घरी पाठवायला हवे, ठाकरे गटाचे आवाहन )

- Advertisement -

पोलिसांकडून अधिक तपास सुरु

ही घटना महिनाभरापूर्वीची, 12 एप्रिलची आहे. एक अल्पवयीन जोडपे चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. त्यातील मुलीने बुरखा घातला होता. या मुलीसोबत इतर चार-पाच परधर्मीय मुलं असल्याचं समजताच दुसऱ्या गटाच्या मुलांनी त्यांना अडवलं. चौकशी केल्यानंतर ती दुसऱ्या समाजातील असल्याचं समोर आलं आहे. बुरखा परिधान करण्याच्या वादातून तरुणांच्या दोन गटात वादावादी, मारहाणीची घटना घडली. या घटनेची माहिती पालकांना उशिरा केली

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -