Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पंतप्रधान मोदी यांनी शिंदे-फडणवीस यांना घरी पाठवायला हवे, ठाकरे गटाचे आवाहन

पंतप्रधान मोदी यांनी शिंदे-फडणवीस यांना घरी पाठवायला हवे, ठाकरे गटाचे आवाहन

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra political crisis) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेला निकाल दिशादर्शक आहे. न्यायालयाने गोंधळ घातला व गोंधळ वाढवला असे जे सांगतात ते आम्हाला मान्य नाही. न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलेले सरकार आजही सत्तेवर आहे याचा दोष राष्ट्रपती, पंतप्रधान व गृहमंत्री शहांकडे जातो. सरकारकडे असलेले बहुमत हे घटनाबाह्य आहे. या एकाच मुद्द्यावर महान लोकशाहीरक्षक पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शिंदे-फडणवीस यांना घरी पाठवायला हवे, असे आवाहन ठाकरे गटाने केले आहे.

हेही वाचा – ‘चोर आणि लफंगे’ हीच भाजपाच्या सत्तेची गुरुकिल्ली, ठाकरे गटाचा घणाघात

- Advertisement -

काँग्रेसने (Congress) आपल्याला 91 वेळा शिव्या दिल्या या मुद्द्यावर मोदी यांनी कर्नाटकात रान उठवले. ते रान पेटलेच नाही, पण महाराष्ट्रात त्यांनीच नेमलेल्या सरकारने गेल्या नऊ महिन्यांत ‘191’ वेळा घटनेचा खून केला. त्या खुन्यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवूनही पंतप्रधान मोदी गप्प आहेत, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.

घटनेची चिंता आहे कोणाला?
विधिमंडळात एखादा पक्ष फुटला असेल तर त्या फुटीर गटाला मूळ पक्षावर दावा सांगता येणार नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने बजावले. तरीही घटनेचे संरक्षक असलेल्या मोदीछाप निवडणूक आयोगाने शिवसेना व चिन्ह फुटीर गटाच्या हवाली केले. सर्वोच्च न्यायालयास ते मान्य नाही. या एका मुद्द्यावर राष्ट्रपतींनी निवडणूक आयोगाला घरी पाठवायला हवे, पण येथे घटनेची चिंता आहे कोणाला? हमाम मे सब नंगे, अशी बोचरी टीका सामना दैनिकातील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) केली आहे.

- Advertisement -

‘ते’ लवकरच कायमचे घरी जातील
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सरकार पूर्णपणे बेकायदेशीर, घटनाबाह्य ठरवले. तरीही राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री विजयी हास्याने, ‘‘आम्हीच जिंकलो आहोत. निकाल आमच्या बाजूनेच लागला. लोकशाहीचा विजय झाला,’’ असे सांगत आहेत. नैतिकता तर त्यांनी ठाण्याच्या मासुंदा तलावात बुडवलीच, पण उरलीसुरली लाजही नागपूरच्या अंबाझरी तलावाकाठी उघडी होऊन नाचताना दिसत आहे. प्रत्येकजण नंगा होऊन आनंदोत्सव साजरा करतोय. उघडे होऊन नाचत आहे. महाराष्ट्र हे सगळे पाहत आहे. जग त्यांच्यावर हसत आहे. श्रद्धा आणि सबुरी ठेवूया, सर्वोच्च न्यायालयाने उघडे पाडलेले लवकरच कायमचे घरी जातील, असा विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा – सुप्रीम कोर्टाने ‘हे’ प्रकरण अधिक गांभीर्याने घ्यायला हवे, ठाकरे गटाने व्यक्त केली चिंता

- Advertisment -