घरमहाराष्ट्रनौदलाची ताकद वाढणार, मुंबईत दोन युद्धनौकांचे १७ मे रोजी जलावतरण

नौदलाची ताकद वाढणार, मुंबईत दोन युद्धनौकांचे १७ मे रोजी जलावतरण

Subscribe

स्वदेशी युद्धनौका बांधण्याच्या क्षेत्रात मुंबईतील माझगाव डॉक यार्डमध्ये १७ मे हा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. माझगाव गोदीमध्ये बांधणी केलेल्या विनाशिका आणि फ्रिगेट प्रकारातील दोन युद्धनौकांचे जलावतरण या दिवशी होणार आहे. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे दोन युद्धनौकांच्या जलावतरणाचा एकत्रित सोहळा प्रथमच होत आहे. या दोन युद्धनौकांमुळे नौदलाची ताकद वाढणार आहे.

दोन्ही युद्धनौका आयएनएस सूरत आणि आयएनएस उदयगिरी म्हणून ओळखल्या जातील. सध्या सूरतला यार्ड १२७०७ आणि उदयगिरीला यार्ड १२६५२ या नावाने ओळखले जाते. दोन्ही युद्धनौकांची रचना नौदलाच्या नेव्हल डिझाईन संचालनालयाने केली आहे. दोन्ही युद्धनौका १७ मे रोजी माझगाव डॉकमध्ये काही मिनिटांच्या अंतराने गोदीतून विशिष्ट पद्धतीने पहिल्यांदाच पाण्यात उतरवल्या जातील.

- Advertisement -

जलावतरणानंतर विनाशिका प्रकारातील सूरत युद्धनौकेवर विविध उपकरणे, युद्धसामुग्री बसवली जाईल. त्यामुळे सखोल समुद्रात सूरत युद्धनौकेच्या विविध चाचण्या घेतल्या जातील. त्यानंतर २०२५पर्यंत ती नौदलात दाखल होईल. सूरत युद्धनौका तब्बल ७४०० टन वजनाची असून ती ब्रह्मोससारख्या क्षेपणास्त्रांनी सज्ज असणार आहे. जगातील एक अत्याधुनिक आणि शक्तिशाली युद्धनौका म्हणून ती ओळखली जाईल. आयएनएस सूरतचे नाव गुजरातची व्यावसायिक राजधानी असलेल्या सूरतच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. मुंबईनंतर सूरत हे पश्चिम भारतातील दुसरे मोठे व्यावसायिक केंद्र मानले जाते. १६व्या शतकापासून १८व्या शतकापर्यंत सूरत हे जहाज बांधणीत अग्रगण्य शहर मानले जात असे. येथे बांधलेली जहाजे १००-१०० वर्षे समुद्रात काम करीत असत.

आयएनएस उदयगिरीचे नाव आंध्र प्रदेशातील एका पर्वतराजीवरून ठेवण्यात आले आहे. ही युद्धनौका नौदलाच्या प्रोजेक्ट १७ ए फ्रिगेट प्रकल्पांतर्गत बांधली आहे. पाणबुडीविरोधी कारवाईची मुख्य जबाबदारी या वर्गातील युद्धनौकांवर असणार आहे. या प्रकल्पांतर्गत देशातच एकूण ७ फ्रिगेट्स बांधण्यात येणार होत्या. यापैकी चार माझगाव गोदीत, तर तीन कोलकाता येथील गोदीत बांधल्या जात आहेत. जलावतरण झाल्यावर उदयगिरीवर विविध उपकरणे बसवली जाणार आहेत. त्यानंतर समुद्रात उदयगिरीची कार्यक्षमता तपासून २०२४च्या सुरुवातीला ती नौदलात दाखल होईल.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -