घरमहाराष्ट्रएलईडी दिवे बसविण्याबाबत करार होणार

एलईडी दिवे बसविण्याबाबत करार होणार

Subscribe

सोलापूर शहरात ईईएसएल कंपनीच्या वतीने एलईडी दिवे बसवण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका त्या कंपनीबरोबर सांमजस्य करार करणार आहे.

सोलापूर शहरात ईईएसएल कंपनीच्या वतीने एलईडी दिवे बसवण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका त्या कंपनीबरोबर सांमजस्य करार करणार आहे. किती दिवसात काम करायचे, बचत केलेल्या विजेतून त्यांनी महापालिकेस किती रक्कम द्यायचे, किती दिवसात काम पूर्ण करायचे. काम केल्यानंतर त्यांची दुरुस्ती व देखभाल कशा प्रकारे केले जाणार, वाढत्या वीज बिलाच्या बाबतीत काय करायचे याबाबत कंपनीशी चर्चा सुरू असून, या सर्व बाबीचा करारात समावेश असेल, अशी माहिती आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी दिली.

हेही वाचा – अणुऊर्जा प्रकल्प : उपकरणांच्या निर्मितीसाठी सामंजस्य करार

- Advertisement -

सामंजस्य करारातून शंकेचे निरसन

एलईडी दिवे बसवण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार ईईएसएल कंपनीशी महापालिका करार करणार अाहे. याबाबत चर्चा सुरू आहे. यासाठी महापालिकेस रक्कम द्यावी लागणार नसली तरी आता येणाऱ्या दरमहा लाइट बिलाइतकी रक्कम त्या कंपनीस द्यावे लागणार आहे. त्यांनी बचत केलेल्या रकमेतून मनपास किती टक्के रक्कम परत करणार यासह उपस्थित होणाऱ्या प्रश्नाबाबत महापालिका प्रशासन कंपनीशी चर्चा करत आहे. ते तीन ते चार दिवसात पूर्ण होईल आणि सामंजस्य करार करून सर्व शंकेचे निरसन करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त डाॅ. ढाकणे यांनी दिली.


हेही वाचा – भारत-रशिया दरम्यान झाला ‘हा’ महत्वाचा करार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -