घरमहाराष्ट्रधक्कादायक: कर्जवसुलीसाठी सावकाराचा नवविवाहितेवर बलात्कार

धक्कादायक: कर्जवसुलीसाठी सावकाराचा नवविवाहितेवर बलात्कार

Subscribe

शाहुपूरी पोलिसांनी सावकाराच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सावकारासह २ साथिदार फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

कोल्हापूरामध्ये नवविवाहितेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने घेतलेल्या कर्जमाफीचे आमिष दाखवून तसंच अश्लील व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धकमी देत सावकाराने बलात्कार केला आहे. कोल्हापूर शहराच्या रुईकर कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत सावकाराच्या विरोधात तक्रार दाखल केली. शाहुपूरी पोलिसांनी सावकाराच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सावकारासह २ साथिदार फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

अशी घडली घटना

कोल्हापूरच्या रूईकर कॉलनीतील एका तरुण सावकाराने नवविवाहितेवर बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. तरुण सावकार आणि त्याच्या दोन साथिदारांनी पीडित नवविवाहितेला अमानुष मारहाण करुन तिच्यावर बलात्कार केला. तसंच तिच्या शरीरावर सिगारेटचे चटके देखील दिले. या घटनेनंतर तिघे जण ही फरार झाले आहे. याप्रकरणी पीडितेने शाहुपूरी पोलीस ठाण्यात धाव घेत संशयित आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पालिसांनी सावकारासह त्याच्या दोन साथिदारांविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला आहे.

- Advertisement -

पीडित कुटुंबाने घेतले होते ३० हजाराचे कर्ज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील एका तरुणाशी तिचा प्रेमविवाह झाला होता. कुटुंबियांच्या विरोधामुळे हे नवविवाहित दाम्पत्य कोल्हापूरात रहायला आले. त्यांनी कोल्हापूरात भाड्याने एक घर घेतले. संसारोपयोगी खर्चासाठी त्यांना पैशाची गरज होती. त्यामुळे पीडित महिलेच्या पतीने रुईकर कॉलिनीमध्ये राहणाऱ्या एका सावकाराकडून ३० हजाराचे कर्ज घेतले. पहिले तीन महिने कर्जाची रक्कम फेड केल्यानंतर पुढील हप्ते देण्यास त्यांना अनेक अडचणी आल्या.

कर्ज फेडता येत नसल्याने केला बलात्कार

दरम्यान, कर्जाची वसूली होत नसल्यामुळे सावकर आणि त्याचे साथिदार पीडित महिलेच्या घरी अनेकदा येऊन गेले. त्यांनी दोघांना मारहाण, शिविगाळ करायचा. एक दिवस रात्रीच्या सुमारास सावकार आणि त्याचे साथिदार महिलेच्या घरी आले. महिलेचा पती कुठे असल्याचे त्याने विचारले. मात्र पती कामावर गेले असल्याचे पीडित महिलेने सांगितेल. त्यानंतर सावकाराने एक महत्वाचे काम असल्याचे सांगून पीडित महिलेला कारमधऊन कळंबा रोडवर घेऊन गेला. त्याठिकाणी गाडीतच त्याने दारु पिऊन महिलेवर बलात्कार केला.

- Advertisement -

आरोपींविरोधात कठोर कारवाई करणार

दरम्यान, सावकाराने तिचा अत्याचाराचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर टाकेल अशी धमकी दिली असे करुन त्याने बऱ्याचदा अत्याचर केले. . ऐवढेच नाही सावकाराच्या मित्रांनी देखील महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न केला असल्याची माहिती महिलेने पोलिसांनी दिली आहे. तसंच, संशयित आरोपी याचा फायदा घेत अनेकदा मला अमानुष मारहाण करत तसंच त्यांनी माझ्या शरिरावर सिगारेटचे चटके दिले असल्याचे देखील महिलेने पोलिसांना सांगितले आहे. महिलेने दिलेल्या जबाबावरुन पोलिसांनी संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. आरोपींना लवकरच अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करु असे आश्वासन पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -