घरताज्या घडामोडीमिहानमध्ये टाटा समूहाकडून गुंतवणूक करण्याबाबत टाटा सन्सच्या अध्यक्षांचे गडकरींना पत्र

मिहानमध्ये टाटा समूहाकडून गुंतवणूक करण्याबाबत टाटा सन्सच्या अध्यक्षांचे गडकरींना पत्र

Subscribe

नागपुरमधील मिहानमध्ये टाटा समूहाकडून गुंतवणूक करण्याबाबत टाटा सन्सचे अध्यक्ष नटराज चंद्रशेखरन यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवलं आहे. टाटा समूह मिहानमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचं चंद्रशेखरन यांनी पत्रातून सांगितलं आहे. नितीन गडकरींनी 7 ऑक्टोबर रोजी नटराज चंद्रशेखरन यांना पत्र पाठवून नागपुरातील मिहान सेझमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचे सांगितले होते. त्यामुळे गुंतवणुकीबाबत टाटा समूह पॉझिटिव्ह असल्याचे पत्र चंद्रशेखर यांनी लिहिलं आहे.

नटराज चंद्रशेखरन यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठवलेल्या पत्राबद्दल विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलने समाधान व्यक्त केले आहे. नागपूरच्या मिहान एसईझेडमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध आहे. तसेच टाटा समूहाचे अनेक प्रकारचे उद्योग आणि व्यापार आहेत. टाटा समूहाच्या बिग बास्केटसाठी नागपूरच्या मिहानमध्ये मोठे गोदाम निर्माण केले जाऊ शकतात. तसेच टाटा समूहाच्या ताज ग्रुप ऑफ हॉटेलसाठीही नागपूरच्या मिहानमध्ये वाव आहे, असे वेदचे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

विदर्भ इकोनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलने मिहानमध्ये उद्योग पायाभरणीच्या संधीबाबत एक आराखडा तयार केला आहे. तसेच त्याबाबतचा उल्लेखही गडकरींनी पत्रात केला होता. मात्र, गडकरींना पाठवलेल्या पत्रात टाटा समूहाची टीम नागपूर मिहान मधील उद्योग विस्ताराच्या संदर्भात वेदच्या संपर्कात राहील असे म्हटले आहे.


हेही वाचा : सत्ता गेली चुलीत, त्याची आम्हाला काही पर्वा नाही; बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -