घरमहाराष्ट्रचिमुरडीवर अत्याचार करून हत्या

चिमुरडीवर अत्याचार करून हत्या

Subscribe

आरोपी जेरबंद, पेणसह रायगड जिल्हा हादरला

अवघ्या 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री 11.30 वाजता येथून जवळ मळेघर वाडीत घडली असून, माणुसकीला काळीमा फासणार्‍या या घटनेमुळे पेणसह संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे. पोलिसांनी त्वरित हालचाल करीत नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

शहरात आदिवासी वाडी असून तेथे या दुर्दैवी चिमुरडीचे कुटुंब राहते. रात्रीच्या सुमारास आरोपी या झोपडीजवळ गेला. झोपडीला दार नसल्याचा फायदा घेऊन त्याने घरात झोपलेल्या 3 वर्षीय चिमुरडीला उचलून नेले. त्यानंतर या चिमुकलीवर अत्याचार केला आणि हत्या केली. त्यानंतर मृतदेह आदिवासी वाडीत आणून टाकला, हा प्रकार लक्षात येताच एकच खळबळ उडाली.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे आणि अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी एका तासाच्या आत आरोपीला जेरबंद केल्याची माहिती दुधे यांनी पत्रकारांना दिली. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांच्या रॉकी या श्वानाची मदत घेण्यात आली. आरोपी विरोधात पोलिसांनी अपहरण, बलात्कार, अ‍ॅट्रॉसिटी, पोस्को आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक दीपश्री पोटफोडे आणि उप जिल्हाप्रमुख नरेश गावंड यांनी केली आहे. आरोपीला संशयाचा फायदा मिळू नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून, पोलीस अधिकार्‍यांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

मन सुन्न करणार्‍या या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बळी पडलेल्या चिमुरडीच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोलणे झाल्याचे तटकरे म्हणाल्या. तर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, तसेच याचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी आपण गृहमंत्र्यांची भेट घेऊन करणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

या आधीही अत्याचाराचा आरोप
आरोपीने यापूर्वीही बलात्कार आणि अपहरण अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत. सध्या तो जामिनावर सुटला होता. या प्रकरणातून तो संशयाचा फायदा घेऊन सुटू नये याची पोलिसांनी काळजी घ्यावी, अशी मागणी येथे जोर धरू लागली आहे. शाळा, कॉलेज, सोसायटी, बाजारपेठ, बंगले, कार्यालये, घर, हॉटेल, बँका, संस्था आदी ठिकाणी सीसीटीव्ही लावावे, तसेच नगर परिषदेने गर्दीच्या ठिकाणी आणि शहरात येण्याच्या मार्गांवर, तसेच उद्याने या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -