घरदेश-विदेशLive Update : ट्रक चालक आणि प्रशासनामधील बैठक निष्फळ; वाहनचालक संघटना आपल्या...

Live Update : ट्रक चालक आणि प्रशासनामधील बैठक निष्फळ; वाहनचालक संघटना आपल्या संपावर ठाम

Subscribe

ट्रक चालक आणि प्रशासनामधील बैठक निष्फळ; वाहनचालक संघटना आपल्या संपावर ठाम

टँकर, ट्रक चालक, आरटीओ अधिकारी आणि प्रशासनामधील बैठक निष्फल ठरली आहे. वाहनचालक संघटना आपल्या संपावर ठाम आहेत. दरम्यान, वाहनचालक संघटनेच्या संपावर उद्या पेट्रोल न मिळण्याच्या शंकेने पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

- Advertisement -

टीम इंडियाचे 2024 चे वेळापत्रक जाहीर

जानेवारी (दूर) मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध 1 कसोटी.
जानेवारीमध्ये (होम) अफगाणिस्तान विरुद्ध 3 टी-20 सामने.
जानेवारी-मार्च (होम) मध्ये इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी.
जूनमध्ये टी-20 विश्वचषक.
जुलैमध्ये 3 वनडे, 3 टी-20 विरुद्ध श्रीलंका (दूर).
2 कसोटी, 3 T20 विरुद्ध बांगलादेश विरुद्ध सप्टेंबर-ऑक्टोबर (होम).
ऑक्टो-नोव्हेंबर (होम) मध्ये न्यूझीलंड विरुद्ध 3 कसोटी.
नोव्हेंबर-डिसेंबर (दूर) मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 कसोटी.

- Advertisement -

पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर नागरिकांच्या लांबच लांब रांगा

राज्यात टँकर चालकांनी तीन दिवस संप पुकारला आहे. नवी मुंबईत आज बंदला हिंसक वळण लागले. हा संप आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहन चालकांनी पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण होण्याच्या शक्यतेने पेट्रोल पंपावर रांगा लावल्या आहेत. वाशिम, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि वसईसह इतर ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रांगा लावल्या होत्या.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुटुंबासह रात्री 9 वाजता घेणार सिद्धीविनायक दर्शन


नवी मुंबईत ट्रकचालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण;संतप्त आंदोलकांनी  पोलिसांवर केला हल्ला


नाशिकमध्ये एलपीजी सिलिंडरचा स्फोट; दोन जण गंभीर जखमी

नाशिकमधील इंदिरानगर येथील कलानगरमध्ये एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला आहे.

या स्फोटात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


राज्यातील रेशन दुकानदारांच्या संपात फूट; 25 हजारांपेक्षा जास्त दुकानदारांचा नकार

ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉर किपर फेडरेशन पुणेचा संपात सहभागी होण्यास नकार


नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोची झेप; एक्स्पोसॅट उपग्रहाचं प्रक्षेपण

एक्स्पोसॅट उपग्रह ब्रह्मांडातील बारकाव्यांचं करणार संशोधन

तसंच, ब्लॅक होलचंही रहस्य उलगडणार


नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात

तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरचे दर दीड रुपयाने केले कमी

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती ‘जैसे थे’


इस्रोच्या एक्स-रे पोलारिमीटर’ (एक्स्पोसॅट) उपग्रहाचे आज सकाळी प्रक्षेपण

इस्रो उलगडणार कृष्णविवरांसारखे खगोलीय रहस्य

कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा करणार अभ्यास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -