घरमहाराष्ट्रतारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्त आक्रमक, गाड्यांवर दगडफेक

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्त आक्रमक, गाड्यांवर दगडफेक

Subscribe

पालघरमधील तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिक आणि प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन पुकाराले आहे. नोकरभरती प्रक्रियेमध्ये प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना डावलून परप्रांतियांना नोकरी दिली. त्याच्या निषेधार्थ पालघरमधील ५०० पेक्षा अधिक नागरिकांनी रस्त्यावर उतरुन प्रकल्पाविरोधात आंदोलन सुरु केले. आंदोलनकर्त्यांनी प्रकल्पाकडे जाणारी वाहनं रोखून धरली. त्यानंतर संतप्त आंदोलनकर्त्यांनी वाहनांवर दगडफेक करत तोडफोड केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

प्रकल्पग्रस्तांना नोकरीपासून डावलले

- Advertisement -

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात स्थानिकांना आणि प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. प्रकल्प ३ आणि प्रकल्प ४ मध्ये अनेक तरुणांना नोकरीसाठी ऑफर लेटर देण्यात आले होते. नोकरीसाठी हे तरुण तारापूरमध्ये आले होते, तरी देखील या तरुणांना नोकरीवर घेण्यात आले नाही. बऱ्याचवेळा विनंती करुन देखील या तरुणांना प्रशासनाने नोकरीवर न घेता परप्रांतियांना नोकरी दिल्याचा आरोप करण्यात येतो आहे.

प्रकल्पांच्या गाड्याची तोडफोड

- Advertisement -

नोकरी न दिल्याने संतप्त झालेले स्थानिक आणि प्रकल्पग्रस्त आज सकाळी सहा वाजता तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाहेर रस्त्यावर उतरले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील सहभाग आहे. आंदोलनावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रकल्पाकडे जाणाऱ्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांनी वाहने आत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त होऊन आंदोलनकर्त्यांनी गाड्यांवर दगडफेक करत तोडफोड केली आणि आपला राग व्यक्त केला.

तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार

आंदोलनावेळी गाड्यांवर झालेल्या दगडफेकीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातवरण होते. घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेतली असून, पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. आंदोलनकर्त्यांनी कंपनीच्या गेटवर ठिय्या आंदोलन सुरु केले. जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. दरम्यान शिवसेनेचे आमदार अमित घोडा यांनी घटनास्थळावर आंदोलकांची भेट घेतली असून, सध्या अमित घोडा आणि प्रकल्प अधिकाऱ्यांमध्ये बैठक सुरु आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -