घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : वंचितच्या या जागांवर मविआ निवडणूक लढवणार?

Lok Sabha 2024 : वंचितच्या या जागांवर मविआ निवडणूक लढवणार?

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पण अद्याप तीन पक्षांतील जागा वाटपाचा तिढा सुटताना पाहायला मिळत नाहीये.

मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पण अद्याप तीन पक्षांतील जागा वाटपाचा तिढा सुटताना पाहायला मिळत नाहीये. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला. त्यामुळे आता वंचितसाठी महाविकास आघाडीने दिलेल्या पाच जागांवर स्वत: महाविकास आघाडीच निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Lok sabha 2024 Maha vikas Aghadi will be contest on five seats of vba)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी “आम्ही वंचितसाठी थांबलो आणि अजूनही थांबलेलो आहोत. आम्ही प्रकाश आंबेडकर यांना पाच जागांचा प्रस्ताव त्यांना दिला होता. अजुनही त्यांच्याशी चर्चा करण्याची आम्ही तिन्ही पक्षांची भूमिका आहे. आम्हाला असं वाटतं की देशाच्या लढाईत प्रकाश आंबेडकर हे आमच्यासोबत असावेत. पण प्रत्येक जागेसाठी संघर्ष करावाच लागतो. बारामती लोकसभा मतदारसंघात ही आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. तसेच, वारणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक लढवावीच लागणार आहे. बिनविरोध ते निवडून येणार नाहीत. पण जिंकण्याची जिद्द आणि उमेद असेल तर आपण प्रत्येक जागा जागा नक्कीच जिंकू शकतो”, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

“महाराष्ट्रातील 48 जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांना दिलेल्या पाच जागाही आहेत. प्रत्येक जागेवर आम्ही जिंकणार या जिद्दीने आम्ही या निवडणुकीत उतरतो आहोत. पण प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष या निवडणुकीत उतरणार नसेल तर, आम्ही त्या जागा महाविकास आघाडी म्हणून लढवू आणि जिंकू”, असेही संजय राऊत म्हणाले.

मविआकडून प्रकाश आंबेडकरांना 5 जागांची ऑफर देण्यात आली होती. अनेकदा त्यांच्यात बैठका झाल्या आहेत. अनेक जागांवर चर्चाही झाल्या होत्या. परंतु असं असतानाही, प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलो रे चा नारा दिला आहे.

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

मंगळवारी महाराष्ट्र राज्य समितीची बैठक झाली. या बैठकीत मनोज जरांगेंसोबतही सविस्तर चर्चा झाली. 30 मार्चला जरांगे पाटील आपल्या समाजाशी बोलून निवडणूक लढवणार की नाही याबाबत आपला निर्णय सांगणार आहेत, अशी माहिती आंबेडकर यांनी दिली आहे. आंबेडकर ओबीसी महासंघाशी युती करणार आहेत. ओबीसी, मुस्लीम, जैन समाजाच्या लोकांना उमेदवारी दिली जाईल. तसंच, अधिकाधिक गरिबांना उमेदवारी दिली जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा – POLITICS: शिवसेनेसमोर काँग्रेसचे लोटांगण; आठवड्याभरात निर्णय घेणार, संजय निरुपम यांचा अल्टिमेटम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -