घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : शिवसेना ठाकरे गट एकूण 22 जागा लढवणार; संजय...

Lok Sabha 2024 : शिवसेना ठाकरे गट एकूण 22 जागा लढवणार; संजय राऊतांची माहिती

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024साठी शिवसेनेच्या ठाकरे गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांन एक्सवर (ट्विटर) ही यादी जाहीर केली. त्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक 2024साठी 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यंदाच्या लोकसभेत शिवसेना ठाकरे एकूण 22 जागा लढवणार आहे. सध्या 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून उर्वरित पाच उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. (Lok Sabha 2024 Shiv Sena Thackeray group will contest total 22 seats Information of Sanjay Raut)

लोकसभा निवडणूक 2024साठी शिवसेनेच्या ठाकरे गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांन एक्सवर (ट्विटर) ही यादी जाहीर केली. त्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी “शिवसेना एकूण 22 जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. आता 17 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली असून, उर्वरित पाच उमेदवारांची यादी येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये पालघर, कल्याण-डोंबिवली, मुंबई उत्तर, हातकलंगणे यांचा समावेश आहे. उर्वरित पाच जागांसाठी उमेदवार निश्चित झालेले आहेत. त्यासंदर्भातील नावांची घोषणा येत्या 24 तासांत किंवा पुढील दोन दिवसांत होईल”, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

- Advertisement -

“सांगली आणि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून दावा केलेला असताना त्या जागांवर तिढा अद्याप कायम आहे, असा सवाल संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना महाविकास आघाडीत कोणताही तिढा नाही. ज्याआर्थी शिवसेनेने या जागांवर उमेदवार जाहीर केला, त्याआर्थी त्या जागांवर कोणताही तिढा नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच, रामटेक लोकसभा मतदारसंघ ही शिवसेनेची जागा होती. रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार चार ते पाच वेळा निवडून आलेले आहेत. ही जागा आम्ही सातत्याने लढतो आणि जिंकतो. त्या जागेवर काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला. त्याच्यावर आम्ही कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही. पण रामटेक जागेच्या बदल्यात आम्ही इशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करू असे सांगितले आणि चर्चेतून मार्ग सुटला होता. त्यामुळे तिढा असल्यासारखे वाटत नाहीत. कारण ज्यावेळी काँग्रेसने रामटेकच्या जागेवर उमेदवार घोषित केला. त्यावेळी आम्हीही त्यांना तुम्ही उमेदवारी कशी जाहीर केली? असा प्रश्न विचारला असता, पण काही प्रश्न हे महाविकास आघाडीच्या चर्चेत आले आणि त्यावर निर्णय झाले. त्यामुळे आम्ही एकत्रितरित्या जागा जाहीर करतो आहे”, असेही संजय राऊत यांनी सांगितेल.

‘हातकणंगले’साठी राजू शेट्टींची मविआकडे पाठिंब्यासाठी मागणी

“हातकणंगले लोकसभा मतारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा मागितला आहे. ही जागा शिवसेनेकडे आहे. पण त्याबाबत चर्चा करू आणि निर्णय घेऊ”, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – UDDHAV THACKERAY : शिवसेना ठाकरे गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर; 4 विद्यमान खासदारांना पु्न्हा संधी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -