घरदेश-विदेशArvind Kejriwal : पाठिंबा कशासाठी द्यायचा? केजरीवालांबाबत काँग्रेसचा वेगळा सूर

Arvind Kejriwal : पाठिंबा कशासाठी द्यायचा? केजरीवालांबाबत काँग्रेसचा वेगळा सूर

Subscribe

नवी दिल्ली : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष मैदानात उतरले आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देखील मोदी सरकारवर टीका केली आहे. मात्र, आता केजरीवाल यांच्या अटकेवरून काँग्रेसमधून वेगळा सूर उमटला आहे. त्यांना काँग्रेसने पाठिंबा का द्यायचा, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

हेही वाचा – Thackeray Group : एक पक्षप्रवेश अन् कोळशाचे डाग धुतले गेले; उद्धव गटाची भाजपवर सडकून टीका

- Advertisement -

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीसोबत युती करण्यास नकार देणारे काँग्रेसचे प्रदेश कार्यालयाने अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्यास तयार नाही. ईडीच्या ताब्यात असलेल्या अरविंद केजरीवाल यांचे समर्थन करू नये, असे पंजाब काँग्रेसचे म्हणणे आहे. राजधानी दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये 4 आणि 3चा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. परंतु, पंजाबमधील सर्व 13 जागा दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढवत आहेत. विशेष म्हणजे, विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाचा भाग आहेत. एवढेच नाही तर, पंजाब काँग्रेसने तेथील भगवंत मान सरकारच्या विरोधात निदर्शनेही केली आहेत.

हेही वाचा – Loksabha 2024: प्रकाश आंबेडकरांनी घेतली जरांगेंची भेट; आंबेडकरांच्या मनात काहीतरी वेगळंच

- Advertisement -

अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यावर दिल्लीतील काँग्रेसचे अनेक नेते त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. याशिवाय, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ 31 मार्च रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर रॅलीचे आयोजन केले आहे. यात काँग्रेस सहभागी होणार आहे. तरीही पंजाब काँग्रेस या सर्वांच्या विरोधात आहे. अरविंद केजरीवाल यांचे उघड समर्थन करू नये, असे त्यांचे म्हणणे आहे. आपण असे केले तर त्याचा पंजाबमधील काँग्रेसच्या संभाव्य विजयावर परिणाम होईल. आपण ज्या आपला राष्ट्रीय स्तरावर पाठिंबा देत आहोत, त्याच आम आदमी पक्षाविरुद्ध निवडणूक कशी लढवता येईल, असा प्रश्न पंजाब काँग्रेसने केला आहे. पंजाब व्यतिरिक्त गोवा, हरियाणा, दिल्ली, चंदीगड आणि गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आप आणि काँग्रेसमध्ये समझोता झाला आहे.

पंजाब काँग्रेसचे प्रभारी देवेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. ईडीच्या ताब्यात असलेल्या अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देऊ नये. भगवंत मान सरकारने पंजाबमधील अनेक काँग्रेस नेत्यांवर कारवाई केल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर; 4 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -