घरमहाराष्ट्रPolitics: गुलाम, आश्रितांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात; राऊतांची महायुतीवर जहरी टीका

Politics: गुलाम, आश्रितांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात; राऊतांची महायुतीवर जहरी टीका

Subscribe

मुंबई: गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात. जे मांडलिक, गुलाम असतात, जे आश्रीत असतात त्यांना मागण्याचा अधिकार आणि हक्क नसतो. त्यांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात. आमचं जागावाटप आम्ही महाराष्ट्रातच करतो. कधी मातोश्री तर कधी सिल्व्हर ओक नाहीतर अन्य ठिकाणी बसतो. आम्हाला उठसूट दिल्लीत जाऊन रुमाल टाकून बसावं लागत नाही, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर केला आहे. (Politics Pieces are thrown in the face of slaves dependents Sanjay Raut s venomous criticism of Mahayuti)

काय म्हणाले संजय राऊत?

भाजपा माणसं गळालाच लावते. स्वत:हून मिळवत नाहीत. मग माणसं गाळत जातात. महादेव जानकर यांच्याबाबत बोलणार नाही. तो त्यांचा निर्णय आहे. बारामतीत सुप्रिया सुळे या विक्रमी मतांनी जिंकून येतील, याबाबत आमच्या मनात शंका नाही. आम्ही तिनही पक्ष तिथे कामाला लागलो आहोत. मी स्वत: बारामती मतदारसंघात तीन सभा केल्या आहेत. वेळ पडली तर उद्धव ठाकरे स्वत: बारामतीत सभा घेतील. कार्यकर्त्यांच्या बैठका घेतील. बारामतीत कोणीही येऊ द्या, सुप्रिय सुळे या प्रचंड मतांनी जिंकून येतील. तिथे लढायला कोणी तयार नाही. त्यामुळे असे गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याला गळाला लावा त्याला गळाला लावा आणि गळ्यात घाला, अशी टीका राऊतांनी यावेळी केली.

- Advertisement -

महायुतीचा तिढा 28 मार्चला सुटणार

भाजपाने लोकसभेच्या महाराष्ट्रातील 23 जागांची यादी जाहीर केली आहे. तर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सुनील तटकरेंची रायगड मतदार संघातून यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा मात्र सुटलेला नाही. 28 मार्चला आम्ही तुम्हाला हे चित्र स्पष्ट करू असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

(हेही वाचा: Loksabha 2024: माढ्याचा तिढा आज सुटणार? निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यावर भुजबळांचं भाष्य, म्हणाले…)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -