घरक्रीडाIPL 2024 : ऋतुराज गायकवाडचे IPLमध्ये दुसरे शतक; अशी कामगिरी करणारा ठरला...

IPL 2024 : ऋतुराज गायकवाडचे IPLमध्ये दुसरे शतक; अशी कामगिरी करणारा ठरला CSKचा पहिला फलंदाज

Subscribe

इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वात सातत्याने शतकी खेळी पाहायला मिळते आहे. शतकी खेळी करत विरुद्ध संघासमोर जास्तीत जास्त धावसंख्येचे आव्हान ठेवण्याचा प्रयत्न असतो, तर शतकी खेळीच्या जोरावर संघाला विजयी करण्याचा प्रयत्न खेळाडूंचा असतो. पण या शतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने एक पराक्रम केला आहे

चेन्नई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वात सातत्याने शतकी खेळी पाहायला मिळते आहे. शतकी खेळी करत विरुद्ध संघासमोर जास्तीत जास्त धावसंख्येचे आव्हान ठेवण्याचा प्रयत्न असतो, तर शतकी खेळीच्या जोरावर संघाला विजयी करण्याचा प्रयत्न खेळाडूंचा असतो. पण या शतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने एक पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे असा पराक्रम करणारा ऋतुराज गायकवाड चेन्नईचा पहिला कर्णधार ठरला आहे. (IPL 2024 Ruturaj Gaikwad First Player To Score Century In Ipl As Captain Of Chennai Super Kings)

लखनऊ जाएंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात ऋतुराज गायकवाड याने शतकी खेळी केली. 60 चेंडूत 12 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 108 धावांची खेळी ऋतुराजने केली. विशेष म्हणजे चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या बॅटमधून दुसरे शतक झळकले.

- Advertisement -

लखनऊ जाएंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या सामन्यात चेन्नईची सुरुवात खराब झाली होती. पण कर्णधार ऋतुराज गायकवाड याने शानदार फलंदाजी करत लखनऊच्या गोलंदाजांची धुलाई केली. ऋतुराज शतक झळकावणारा चेन्नईचा पहिला कर्णधार ठरला आहे. गायकवाडचे आयपीएल कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे. त्याने आयपीएल 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध पहिले आयपीएल शतक झळकावले होते.

हेही वाचा – RCB Playoffs Equation: आठ मॅच हरुनही RCB ला मिळणार प्लेऑफचे तिकीट? हे आहे समीकरण

- Advertisement -

लखनऊचा कर्णधार केएल राहुल याने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईची सुरुवात खराब झाली. सलामीला फलंदाजीला आलेला अजिंक्य रहाणे अवघी 1 धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर डॅरिल मिचेलनेही 11 धावांवर आपली विकेट गमावली. मात्र ऋतुराज गायकवाडने संघाचा डाव सावरत अवघ्या 56 चेंडूत शतक झळकावले आणि तसेच नाबाद खेळी केली. गायकवाड याने या सामन्यात 60 चेंडूत 12 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 108 धावांची खेळी केली.

दरम्यान, या सामन्यात चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड तगडी खेळी करत होता तर, दुसऱ्या बाजूने अष्टपैलू शिवम दुबेही लखनऊच्या गोलंदाजांची चांगली धुलाई करत होता. शिवम दुबेने 27 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 66 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर चेन्नई संघाने 210 धावा केल्या. चेन्नई संघाने आयपीएल 2024 मध्ये घरच्या मैदानावर एकही सामना गमावलेला नाही. दरम्यान ऋतुराज गायकवाड सीएसकेसाठी दुसरे शतक झळकावणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्याशिवाय मुरली विजय आणि शेन वॉटसनने हा पराक्रम केला आहे.

CSKसाठी आयपीएलमध्ये शतकी खेळी करणारे फलंदाज

  • 2 – मुरली विजय
  • 2 – शेन वॉटसन
  • 2 – ऋतुराज गायकवाड
  • 1 – मायकेल हसी
  • 1 – ब्रेंडन मॅक्युलम
  • 1 – सुरेश रैना
  • 1 – अंबाती रायुडू

याशिवाय, ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये 17व्यांदा चेन्नईसाठी सलामीवीर म्हणून 50हून अधिक धावा केल्या आहेत. तो आता चेन्नईसाठी सर्वाधिक 50हून अधिक धावा करणारा सलामीवीर बनला आहे. यापूर्वी हा विक्रम फाफ डू प्लेसिसच्या नावावर होता. फाफ डु प्लेसिसने चेन्नईसाठी सलामीवीर म्हणून 16 वेळा 50हून अधिक धावा केल्या होत्या.


हेही वाचा – IPL 2024 : राजस्थानकडून मुंबई दुसऱ्यांदा पराभूत, शिल्पा शेट्टीचा संघ अव्वलच

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -