घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : माढ्यात तिहेरी लढत; गणपतराव देशमुखांचे नातू अपक्ष लढणार

Lok Sabha 2024 : माढ्यात तिहेरी लढत; गणपतराव देशमुखांचे नातू अपक्ष लढणार

Subscribe

दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख माढा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत.

मुंबई : यंदाच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिला आहे. भाजपाने माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज असलेले भाजपाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे दोघांमध्ये चुरशीची लढत होईल, अशी शक्यता असतानाच आता माढा लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख हे नाराज होते. ते आता याच मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत. (Lok Sabha Election 2024 Madha constituency Ganapatrao Deshmukhs grandson aniket deshmukhs will contest as an independent)

अनिकेत देशमुख म्हणाले की, माढा लोकसभेत मागील काही दिवसांपासून ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यामुळे सांगोल्यातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. येथे राहणाऱ्या लोकांना राजकीय लोक गृहीत धरून गणपतराव देशमुख यांच्या नावाने साधारण एक लाख मते मिळणार अशी अपेक्षा करत आहेत. पण महाविकास आघाडीने जे काही केले ते दिशाहीन असल्याची, तसेच आपल्यावर अन्याय झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. महाविकास आघाडीत असल्याने आम्हाला तुमच्याबद्दल चर्चा करायची आहे, असे सांगितले गेले. त्यामुळे आम्ही माढ्यात बैठकीला गेलो. पण चर्चेत आम्हाला एक सांगितलं गेलं आणि बैठकीत दुसरेच ठरले. हा आमच्यासाठी राजकारणातील धडा आहे. यापुढे अशी चूक होणार नाही. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी, असा निर्णय आजच्या बैठकीत घेतला असल्याचे अनिकेत देशमुख यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : उमेदवारी जाहीर होताच नारायण राणे म्हणतात, अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार

महाविकास आघाडीवर निशाणा साधताना अनिकेत देशमुख म्हणाले की, भाजपामधून उमेदवार आयात करून याठिकाणी उमेदवारी द्यावी लागत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जे निष्ठेने काम करतात, त्यांच्यावर अन्याय झाला, अशी भावना आमची आहे. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली आहे. खरं तर पक्ष बदलणाऱ्या लोकांना जनता कंटाळली आहे. त्यांना पर्याय म्हणून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. कार्यकर्त्यांशी बोलून चर्चा करून सर्वांचं एकमत झाल्यास उद्या सकाळी आम्ही अर्ज भरणार, अशी माहितीही अनिकेत देशमुख यांनी दिली.

- Advertisement -

अनिकेत देशमुख कोण? (Who is Aniket Deshmukh?)

दरम्यान, अनिकेत देशमुख हे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू आणि शेकापचे युवा नेते आहेत. 2019 च्या सांगोला विधानसभेच्या निवडणुकीत अनिकेत देशमुख यांचा अवघ्या 700 मतांनी पराभव झाला होता. सांगोला विधानसभेत गणपतराव देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून अनिकेत देशमुख यांच्या उमेदवारीची मागणी होत होती. तसेच माढा मतदारसंघ आपल्याला सोडावा अशी मागणी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनीही केली होती. परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटाने भाजपातून धैर्यशील मोहिते पाटील यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे आता माढा लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेला हा तिढा सोडवण्यात शरद पवार मार्ग काढणार का? हे पाहावे लागेल.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : माढ्यात तिहेरी लढत; गणपतराव देशमुखांचे नातू अपक्ष लढणार

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -