घररायगडLok Sabha : उमेदवारी जाहीर होताच नारायण राणे म्हणतात, अडीच लाखांच्या मताधिक्याने...

Lok Sabha : उमेदवारी जाहीर होताच नारायण राणे म्हणतात, अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार

Subscribe

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होताच अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विश्वास व्यक्त केला.

सिंधुदुर्ग : मागील काही दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू होती. शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र अखेर भाजपाला हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यात यश आले आहे. किरण सामंत यांनी आज माघार घेतल्यानंतर लगेचच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर नारायण राणे यांनी सपत्नीक ग्रामदेवतेचे दर्शन घेतले आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. (Lok Sabha Election 2024 Narayan Rane Ratnagiri Sindhudurg candidature elected with a majority of 2.5 lakh votes)

नारायण राणे म्हणाले की, कुठलंही काम सुरू करायचं असेल किंवा निवडणूक लढवायची असेल तर मी ग्रामदेवतचं दर्शन घेतो. परंतु रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात जागावाटपाबाबत कोणताही तिढा नव्हता. हा केवळ पक्षाचा युक्तिवाद होता. मला उमेदवारी मिळणार हे अगोदरच माहीत होतं, त्यामुळे मी प्रचाराला सुरुवात केली होती, असा दावाही नारायण राणे यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : EVM च्या कथित घोटाळ्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा जागेवर दावा करणाऱ्या किरण सामंत यांनी आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचं आजच जाहीर केलं. यासंदर्भात नारायण राणे यांनी किरण सामंत यांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले की, मी सामंत बंधूंचा आभारी आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला उमेदवारी दिली, त्याबद्धल मी त्यांचाही आभारी आहे.

- Advertisement -

नारायण राणे म्हणाले की, विकासाचा आणि मोदींचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. यंदाच्या निवडणुकांमध्ये 400 पार करायचं आहे. यासाठी आपला देश विकसित बनावा, आत्मनिर्भर बनावा हे प्रचाराचे मुद्दे असतील. उद्या सकाळी 11 वाजता मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तसेच अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार, असा विश्वासही नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : निवडणुकांमध्ये महिला मतदारांची संख्या लक्षणीय; आता काय असेल चित्र?

फेविकॉलचा जोड दिसेल (Addition of fevicol will be seen)

नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नितेश राणे म्हणाले की, उमेदवारी जाहीर करण्यासाठी उशीर झालेला नाही. आम्ही आधीपासूनच काम करत होतो. परंतु किरण सामंत निवडणुकीतून माघार घेतली असली तरी ते नाराज नाहीत. आम्ही या निवडणुकीत एकत्र काम करणार आहोत. तुम्हाला आमचा फेविकॉलचा जोड दिसेल. राणे आणि सामंत कुटुंब मिळून निवडणुकीला सामोरे जाऊ, असं नितेश राणे म्हणाले.

विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे लढत (Vinayak Raut vs Narayan Rane fight)

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना पक्षाचा एबी फॉर्म थोड्याच वेळात दिला जाणार आहे. ते उद्याच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत विरुद्ध भाजपा उमेदवार नारायण राणे अशी लढत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांच्या मनामनातील सुनबाई…, फडणवीसांचे सुनेत्रा पवारांबद्दल वक्तव्य

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -