घरमहाराष्ट्रNarendra Modi : बारशाला गेला अन् बाराव्याला आला; काँग्रेसवर निशाणा साधताना मोदींची...

Narendra Modi : बारशाला गेला अन् बाराव्याला आला; काँग्रेसवर निशाणा साधताना मोदींची खोचक टीका

Subscribe

काँग्रेसच्या काळात जसे काम होत होते, त्यावर मराठीत एक म्हण आहे. बारशाला गेला आणि बाराव्याला आला, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

वर्धा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विदर्भातील वर्धा येथे महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसच्या काळात जसे काम होत होते, त्यावर मराठीत एक म्हण आहे. बारशाला गेला आणि बाराव्याला आला. कारण काँग्रेसच्या काळात एखादे काम पूर्ण होत नव्हते. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले, अशा शब्दात मोदींनी टीका केली आहे. (Lok Sabha Election 2024 Narendra Modis sharp criticism while targeting Congress)

नरेंद्र मोदी म्हणाले की, आज देश विकसित भारताच्या दिशेने जात आहे आणि विकसित भारत जास्त लांब नाही. त्यामध्ये वर्ध्याचाही आशीर्वाद पाहिजे. आज संपूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे की, पुन्हा एकदा मोदी सरकार, पण 2014 च्या आधी अशी धारणा बनली होती की, या देशात काही होऊ शकत नाही. सगळीकडे निराशा पसरली होती. खेडे गावापर्यंत वीज पोहोचेल, असे वाटत नव्हते. गरिबांना वाटत होते की, आपल्या कितीही पिढ्या गेल्या तरी आपली गरीबी हटणार नाही. शेतकऱ्यांना वाटत होते की, कितीही कष्ट केले तरी भाग्य बदलणार नाही. पण आम्ही गेल्या 10 वर्षात 25 कोटी कुटुबांना गरिबीमधून बाहेर काढले. गावागावात वीज पोहोचवली. 4 कोटी कुटुबांना पीएम आवास योजनेचा लाभ दिला. 50 कोटींपेक्षा जास्त लोक बँकेशी जोडले आहेत. त्यामुळे आज संपूर्ण देश आत्मविश्वासाने मोदींची गॅरंटी पाहतो आहे, असं मोदी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : राणेंसोबत उमेदवारी अर्ज भरायला गेलेले किरण सामंत म्हणतात, धनुष्यबाण चिन्ह असतं तर…

बारशाला गेला आणि बाराव्याला आला (Went to Barsha and came to the twelfth)

नरेंद्र मोदी म्हणाले की, मला सर्वांची सेवा करायची आहे. कारण अशी गॅरंटी द्यायला खूप हिंमत लागते. पण कितीही अडचणी आल्या तरी मी हे काम करणार आहे. माझ्यासाठी गॅरंटी ही फक्त तीन अक्षरे नाहीत, तर जबाबदारी आहे. त्यामुळे आता पुढच्या पाच वर्षात आणखी 3 कोटी घर गरीबांना मिळणार आहेत. तसेच 70 वर्षापुढील व्यक्तींसाठी पाच लाखांच्यावरील खर्च मोफत असणार आहे. विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाची निती कायमच शेतकऱ्यांच्या विरोधी राहिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था कायमच बिकट राहिली. काँग्रेसच्या काळात जसे काम होत होते, त्यावर मराठीत एक म्हण आहे. बारशाला गेला आणि बाराव्याला आला. काँग्रेसच्या काळातील पिढ्यांना माहीत असेल एखादे काम पूर्ण होत नव्हते. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात देशाला नुकसान सोसावे लागले, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

- Advertisement -

 हेही वाचा – Lok Sabha 2024 : मतचिठ्ठीवर गडकरींचा फोटो, भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -