घरमहाराष्ट्रPrakash Ambedkar : राहुल गांधींचा स्क्रिप्ट रायटर भाजपाचा एजंट; प्रकाश आंबेडकरांची जोरदार...

Prakash Ambedkar : राहुल गांधींचा स्क्रिप्ट रायटर भाजपाचा एजंट; प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका

Subscribe

प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींचा उल्लेख भाजपावर टीका केली. त्यांनी म्हटले की, राहुल गांधी बुद्धीमान आहेत, पण त्यांना असिस्टंट लागतो. राहुल गांधींचा स्क्रिप्ट रायटर हा भाजपाचा आहे, अशी मला शंका येते.

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आज नवा मोंढा येथे प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी राहुल गांधींचा उल्लेख भाजपावर टीका केली आहे. राहुल गांधी बुद्धीमान आहेत, पण त्यांना असिस्टंट लागतो. राहुल गांधींचा स्क्रिप्ट रायटर हा भाजपाचा आहे, अशी मला शंका येते. कारण ते भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून चार हजार किलोमीटर चालून मुंबईपर्यंत आले आणि सभेत उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, आमची लढाई मोदींशी नसून अदृश्य शक्तींशी आहे. त्यांच्या या एका वाक्याने त्यांच्या परिश्रमावर पाणी फिरले, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी खंत व्यक्त केली. (Lok Sabha Election 2024 Rahul Gandhis Script Writer BJP Agent Prakash Ambedkar)

जाहीर सभेला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, बोफार्समध्ये राजीव गांधी यांची बदनामी करण्यात आली. परंतु त्यात काहीच निघाले नाही. आता राफेल खरेदीत लाच दिल्यावरुन फ्रेंच सरकारने दोन अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात आले. धक्कादायक म्हणजे लाच घेणारे हे भारतातीलच आहेत. ते कोण आहेत, हे शोधणे गरजेचे आहे. परंतु काँग्रेस या सर्वात फुसका बार निघाली.

- Advertisement -

निवडणूक रोखे प्रकरणी सर्व कागदपत्रे समोर आल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. पण त्यानंतर आता काँग्रेस पुन्हा एकदा मूग गिळून गप्प बसली आहे. या सर्वात राहुल गांधींचं वाईट वाटतं. कारण ते बुद्धीमान असूनही त्यांना असिस्टंट लागतो आणि राहुल गांधींचा स्क्रिप्ट रायटर हा भाजपाचा असल्याची मला शंका येते. कारण भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून चार हजार किलोमीटर चालून मुंबईपर्यंत आले. त्यानंतर मुंबईतील सभेत आमची लढाई मोदींशी नसून अदृश्य शक्तींशी असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या या एका वाक्याने सर्व परिश्रमावर पाणी फिरले, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

हेही वाचा – Prakash Ambedkar : राहुल गांधींचा स्क्रिप्ट रायटर भाजपाचा एजंट; प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका

- Advertisement -

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, निवडणूक रोखे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी तंबी दिल्यानंतर बँकेने सर्व कागदपत्रे पुढे आणली. त्यात भाजपा आणि कॉंग्रेसलाही पैसा मिळाला आहे. ज्या ड्रग कंपन्याच्या औषधांमुळे लोकांचे मृत्यू होत आहेत. त्या कंपन्यांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र कंपन्यांनी 300 ते 400 कोटी रुपयांचे रोखे घेवून ते भाजपाला दिले. त्यानंतर या कंपन्याचे ड्रग पुन्हा बाजारात आले. लोक मेले तरी चालतील पण पक्षाच्या तिजोरीत पैसे आला पाहिजे, अशी भाजपाची भूमिका असल्याचा गंभीर आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

गरीब मराठ्याला उमेदवारी नाही

काँग्रेस आणि भाजपावर निशाणा साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, दोन्ही पक्षांनी एकाही गरीब मराठ्याला लोकसभेची उमेदवारी दिली नाही. मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू असताना या नेत्यांनी पाठींबा का दिला नाही? असा सवाल मराठा समाजाने विचारायला पाहिजे, असे आंबेडकरांनी सांगितले. तसेच सध्याची सत्ता ही निजामी मराठ्यांची आहे. ते उपेक्षितांना जवळ करण्यास तयार नाहीत, असा टोलाही आंबेडकरांनी यावेळी लगावला.

हेही वाचा – Narendra Modi : बारशाला गेला अन् बाराव्याला आला; काँग्रेसवर निशाणा साधताना मोदींची खोचक टीका

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -