घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : जनता सोबत नाही म्हणूनच...; अजितदादांनी मतदारांना दिलेल्या इशाऱ्यावर...

Lok Sabha 2024 : जनता सोबत नाही म्हणूनच…; अजितदादांनी मतदारांना दिलेल्या इशाऱ्यावर रोहित पवारांची टीका

Subscribe

पुण्यातील एका सभेबाबत बोलताना मशीनमध्ये पटापट बटण दाबा म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल. नाहीतर मला माझा हात आखडता घ्यायला लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला होता. त्यामुळे आता विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे.

पुणे : राज्यात लोकसभेच्या प्रचारसभांनी जोर धरला आहे. प्रत्येक पक्षाचे नेते वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन आपापल्या पक्षाचा प्रचार करताना पाहायला मिळाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभांचा धडाका लावला असून ते मतदारांना आश्वासन देण्यात कोणतीही कमतरता सोडत नसल्याचेच पाहायला मिळत आहे. मात्र, पुण्यातील एका सभेबाबत बोलताना मशीनमध्ये पटापट बटण दाबा म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल. नाहीतर मला माझा हात आखडता घ्यायला लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला होता. त्यामुळे आता विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. (Lok Sabha Election 2024 Rohit Pawar on Ajit Pawars warning to voters
Criticism)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करताना अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी सभेत भाषण करताना निधीबाबत वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे. अजित पवार नेमकं कोणत्या निधीबाबत बोलत आहेत? मलिदा गँगचे सदस्य असलेल्या आणि त्यांच्या मित्रांकडे असलेल्या निधीबाबत की सरकारी विकास निधीबाबत? असे प्रश्न रोहित पवार यांनी विचारले आहेत. त्यांनी असेही म्हटले की, जनता साथ देत नाही म्हणून आता निधीची धमकी देणे हा आचारसंहितेचा भंगच म्हणावा लागेल. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election : शरद पवारही बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात; उमेदवारी अर्ज दाखल करणार

- Advertisement -

अजित पवार काय म्हणाले? (What did Ajit Pawar say?)

पुण्यातील एका सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल, पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा तो कोणामुळे झाला हे विसरू नका. विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील पटापट बटण दाबा म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल. नाहीतर मला माझा हात आखडता घ्यावा लागेल, असा इशाराच अजित पवार यांनी मतदारांना दिला. त्यामुळे आता निवडणूक आयोग अजित पवारांवर कारवाई करणार का? हे पाहावे लागेल.

 हेही वाचा – Lok Sabha 2024 : द्रौपदीबाबत केलेल्या अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुषमा अंधारेंकडून संताप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -