घरमहाराष्ट्रLok Sabha : पहिल्या टप्प्यातील प्रचार थंडावला, महायुती आणि मविआतील नेत्यांची कसोटी...

Lok Sabha : पहिल्या टप्प्यातील प्रचार थंडावला, महायुती आणि मविआतील नेत्यांची कसोटी लागणार

Subscribe

आरोप-प्रत्यारोप, टीकेचे जोरदार प्रहार, नेत्यांच्या सभा, पदयात्रा यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शिगेला पोहचलेला प्रचार आज थंडावला आहे.

मुंबई : आरोप-प्रत्यारोप, टीकेचे जोरदार प्रहार, नेत्यांच्या सभा, पदयात्रा यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शिगेला पोहचलेला प्रचार आज थंडावला आहे. निवडणूक आचारसंहितेनुसार मतदानाच्या 48 तास आधी उमेदवारांना निवडणूक प्रचार करता येत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष प्रचार संपल्यानंतर उमेदवारांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा भर छुप्या प्रचारावर असणार आहे. मात्र निवडणूक निकाल येईपर्यंत महायुती आणि मविआतील नेत्यांची कसोटी लागणार आहे. (Lok Sabha Election 2024 Campaigning in the first phase has cooled down the leaders of Mahayuti and Maviya will be tested)

अठराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होत आहे. त्यात राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली -चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. नागपूर आणि चंद्रपूर मतदार संघात दुहेरी लढत होणार आहे. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे हे उभे आहेत. तसेच चंद्रपूरमधून भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर मैदानात आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Devendra Fadnavis : भाजपा घटनेला कोणाला हात लावू देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

रामटेक, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. रामटेक मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचे राजू पारवे, महाविकास आघाडीकडून श्याम बर्वे आणि अपक्ष उमेदवार किशोर गजभिये हे उमेदवार आहेत. रश्मी बर्वे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांचे पती श्याम बर्वे मैदानात आहेत. तर वंचितने किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर करून महायुती आणि महाविकास आघाडीची कोंडी करण्याच प्रयत्न केला आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे नामदेव किरसान, महायुतीचे अशोक नेते आणि वंचितचे हितेश मडावी यांच्यात लढत होणार आहे. तर भंडारा-गोंदिया मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे, महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे आणि वंचितचे उमेदवार संजय केवट यांच्यात लढत होणार आहे.

- Advertisement -

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात भाजपा उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आदींनी प्रचारसभा घेतल्या. पंतप्रधान मोदी यांनी चंद्रपूर आणि रामटेक या दोन लोकसभा मतदारसंघात प्रचारसभा घेऊन मतदारांना महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. चंद्रपूरमध्ये भाजपा उमेदवार सुधीर मुनगुंटीवार यांच्या प्रचारासाठी अभिनेता सुनील शेट्टीने रॉड शो केला होता.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : द्रौपदीबाबत केलेल्या अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुषमा अंधारेंकडून संताप

तर काँग्रेस उमेदवारांसाठी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचारसभा घेतल्या. याशिवाय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह जिल्हा नेत्यांनी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतःला झोकून दिले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराची धुरा प्रकाश आंबेडकर एकहाती सांभाळत आहेत.

शरद पवार, उद्धव ठाकरे प्रचारापासून लांब (Sharad Pawar, Uddhav Thackeray away from campaigning)

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने जोर लावलेला असताना महाविकास आघाडीत उमेदवारांच्या प्रचाराची धुरा प्रामुख्याने काँग्रेस नेत्यांना वहावी लागत आहेत. पहिल्या टप्प्यातील पाचही जागांवर काँग्रेसचे उमेदवार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या स्टार प्रचारकांनी निवडणूक प्रचारापासून लांब राहणे पसंत केले आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : महायुतीतील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सुटला? निलेश राणेंचे सूचक वक्तव्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -