घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : वयाची भाषा करणाऱ्यांनी..., रोहित पवारांचे अजित पवार गटाला...

Lok Sabha 2024 : वयाची भाषा करणाऱ्यांनी…, रोहित पवारांचे अजित पवार गटाला आव्हान

Subscribe

शरद पवार यांनी या निवडणुकीत 10 सभा घेतल्या आहेत तर येणाऱ्या 20-25 दिवसांत संपूर्ण राज्यात 50हून अधिक सभा घेऊन झंझावाती प्रचार दौरा करणार आहेत. त्यांच्या वयावरून टीका करणारे सर्व नेते मिळून तरी एवढ्या सभा घेऊ शकतील का? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक कलगीतुरा रंगला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वयावरून टिप्पणी केली आहे. त्याचाच संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट अजित पवार आणि त्यांच्या समर्थक नेत्यांना थेट आव्हान दिले आहे. (Lok Sabha Election 2024 : Rohit Pawar’s challenge to Ajit Pawar group on age issue)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांचे असल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने देण्यापूर्वी या पक्षाचे शिबीर शिर्डीमध्ये झाले होते. या शिबिरात अजित पवार यांनी शरद पवार यांचे प्रत्यक्ष नाव न घेता वयाबद्दल टिप्पणी केली होती. गेल्या तीस वर्षांची माझी कारकीर्द पाहिली तर तुम्हालाही वाटेल मला कुठलीतरी संधी दिली पाहिजे होती, असे सांगून अजित पवार म्हणाले की, 80 वर्षांच्या लोकांनी आता आशीर्वाद द्यायला पाहिजे आणि मार्गदर्शन करायला पाहिजे.

- Advertisement -

त्यानंतर लगेचच ठाण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात देखील, शरद पवार यांनी आता निवृत्त व्हावे, असे अजित पवार यांनी सुचविले. राज्य सरकारमध्ये वयाच्या 58व्या वर्षी रिटायर्ड होता. पण आता निवृत्तीचे वय 60 वर्षांपर्यंत करण्याची त्यांची मागणी आहे. मात्र काही 80 – 84 वय झाले तरी रिटायर्ड व्हायला तयार नाहीत, असे ते म्हणाले होते.

- Advertisement -

हाच संदर्भ देत आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाला आव्हान दिले आहे. शरद पवार यांच्या वयावरून अनेक नेते टीका करत होते, परंतु त्याच शरद पवार यांनी या निवडणुकीत 10 सभा घेतल्या आहेत तर येणाऱ्या 20-25 दिवसांत संपूर्ण राज्यात 50हून अधिक सभा घेऊन झंझावाती प्रचार दौरा करणार आहेत. त्यांच्या वयावरून टीका करणारे सर्व नेते मिळून तरी एवढ्या सभा घेऊ शकतील का? वयाची भाषा करणाऱ्यांनी पैलवानाचा सामना मैदानात करावा, आहे का हिम्मत? असे आव्हान त्यांनी दिले आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : राज्याची तिजोरी वैयक्तिक एफडी आहे का? आव्हाडांचा अजितदादांना प्रश्न


Edited by – Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -