घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : अचानक काय झालं? महायुती टिकण्यासाठी आमदार सुनील शेळकेंची...

Lok Sabha 2024 : अचानक काय झालं? महायुती टिकण्यासाठी आमदार सुनील शेळकेंची देवाकडे प्रार्थना; वाचा सविस्तर

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 साठी राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे. यासाठी दोघांनीही आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र अनेक जागांवर उमेदवार जाहीर करणे अद्याप बाकी आहे.

मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 साठी राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे. यासाठी दोघांनीही आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र अनेक जागांवर उमेदवार जाहीर करणे अद्याप बाकी आहे. एकिकडे महायुतीच्या विजयासाठी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कंबर कसली आहे. अशात, पुढील काळात महायुती टिकेल का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी महायुती टिकावी यासाठी देवाकडे प्रार्थना केल्याचे समजते. यावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Ajit Pawar group MLA Sunil Shelke says I pray to God for mahayuti)

नेमकं काय म्हणाले सुनील शेळके?

“लोकसभा निवडणूक होणार असून या निवडणुकीत प्रत्येकाला जबाबदारी मिळणार आहे. ज्याच्याकडे जी जबाबदारी असेल, त्यांनी ती कामं केलीच पाहिजे. पण सहा महिन्यानंतर काय होईल माहीत नाही. परंतू, महायुती टिकावी अशी प्रार्थना देवाकडे करतो आहे”, असे विधान आमदार सुनिल शेळके यांनी केले. तसेच, “ही सगळी मंडळी कशी पटापटा पळतील त्याचाही विचार करतो आहे. ही मला चार ते साडेचार वर्ष झाले सापडतच नव्हती, मला बघू पळायची. आज सगळे सापडले. त्यामुळे माझा उर भरून आला आहे. त्यामुळे सगळ्यांना मिठ्या मारायला पाहिजेत. आता जर तुमच्या गळ्यात पडायला गेलो तर, गणेश भेगडे म्हणतील तु गळ्यात पडायच्या आधी तुला कसा ढकलतील हे बघतोय पण तुम्हालाही माहीत नसेल, तुमच्या खाली मी सुद्धा सुरुंग लावून बसलो आहे”, असं वक्तव्य आमदार सुनील शेळके यांनी केले.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : राज्याची तिजोरी वैयक्तिक एफडी आहे का? आव्हाडांचा अजितदादांना प्रश्न

“मी कुठल्या मुहूर्तावर आमदार झाले मलाच समजत नाही. मला केवळ मुहूर्त सांगितला त्यावेळी मी फॉर्म भरून आलो होतो. पण पाच वर्षांच्या काळात मी बरेच काही पाहिले आहे. मी जे चित्र पाहिलं असून असे काही अनुभवले आहे की, पुढच्या 25 वर्षात देखील असं चित्र पाहता येणार नाही. कोविडचा काळ पाहिला, सकाळचा शपथविधी पाहिला, परत महाविकास आघाडी झाली, त्यानंतर परत विरोधात जाऊन बसलो, त्यानंतर महायुतीत आलो, सगळ्यांसोबत सत्तेत बसलो आणि सगळ्यांसोबत विरोधात बसलो. पण मावळच्या जनतेसाठी तिथं जावं लागेल तिथं जायची वेळ आली तरी मान अपमान पाहिला नाही, या जनतेसाठी जी भूमिका घ्यावी लागली ती भूमिका घेतली”, असेही सुनील शेळके म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – LOK SABHA ELECTION 2024 : सोलापूरच्या तुलनेत माढा जिंकणं भाजपसाठी कठीण; चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -