घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रLok Sabha 2024 : मंत्री ते होते आणि हिशोब मला विचारतात, शहांच्या...

Lok Sabha 2024 : मंत्री ते होते आणि हिशोब मला विचारतात, शहांच्या प्रश्नाला शरद पवारांचा टोला

Subscribe

शरद पवार यांनी काँग्रेसच्या 10 वर्षांच्या सरकारमध्ये महाराष्ट्राला काय दिले? असा प्रश्न केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता. अमित शहांच्या या प्रश्नाला उत्तर देत शरद पवारांनी खरमरीत टोला लगावला आहे.

पुणे : केंद्रीय मंत्री अमित शहा यांची गुरुवारी, 11 एप्रिलला प्रचार सभा पार पडली. या प्रचार सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केलाय. शरद पवार यांनी काँग्रेसच्या 10 वर्षांच्या सरकारमध्ये महाराष्ट्राला काय दिले? याचे उत्तर द्यावे. अमित शहांच्या या प्रश्नाला उत्तर देत शरद पवारांनी खरमरीत टोला लगावला आहे. (Lok Sabha Election 2024 Sharad Pawar criticism while answering Amit Shah question)

महाविकास आघाडीकडून बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे सुळेंचा उमेदवारी अर्ज गुरुवारी (ता. 18 एप्रिल) दाखल करण्यात आला आणि आज शुक्रवारी (ता. 19 एप्रिल) त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. परंपरेनुसार राष्ट्रवादीकडून बारामतीतील कन्हेरी गावातून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. याच सभेतून शरद पवारांनी अमित शहांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha : नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळांची माघार

कन्हेरी येथील भाषणातून मोदी सरकारवर निशाणा साधत शरद पवार म्हणाले की, हे सरकार घटना बदलणार असल्याचे सांगत आहे. पण अमित शहा नावाचे गृहस्थ हे मला मी 10 वर्षांमध्ये काय केले असा प्रश्न विचारतात. पण गेल्या 2014 ते 2024 पर्यंत ते सत्तेत होते, मंत्री ते होते आणि हिशोब मला विचारतात, असा टोला पवारांनी लगावला. तर, मोदी सांगतात महागाई 50 टक्क्यांनी कमी करू. पण त्यांनी ती महागाई केवळ दीड पट कमी केली आहे. ही पाकीटमारी बंद करायची आहे, असे टीकास्त्रही पवारांनी डागले.

- Advertisement -

काय म्हणाले होते अमित शहा?

अमित शहांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना प्रश्न विचारत म्हटले की, एक गोष्ट सांगा, 10 वर्षांपर्यत तुम्ही सोनिया, मनमोहन सरकारचे कर्ताधर्ता होते, तुम्ही 10 वर्षात महाराष्ट्राला काय दिले? नांदेडकरांनो हिशोब मागायला हवा की नाही? त्यांनी हिशोब द्यायला हवा की नको? पण ते याचा हिशोब देणार नाहीत. पण मी हिशोब देणार आहे, असे म्हणत त्यांच्यावर टीका केली.

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : शरद पवारांची चाणक्यनिती, अनिकेत देशमुखांची माढ्यातून माघार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -